Wednesday, April 24, 2024
Homeजळगावबीएचआर प्रकरण : जवाबचा अभ्यास करून ठरविणार तपासाची दिशा

बीएचआर प्रकरण : जवाबचा अभ्यास करून ठरविणार तपासाची दिशा

जळगाव jalgaon

बीएचआर प्रकरणात (BHR case ) जामिनीसाठी (surety) मदत करण्याचे आश्वासन देऊन सव्वा कोटींच्या खंडणी (case of extortion) प्रकरणात एसआयटी समितीकडून (SIT committee) फिर्यादीसह सहा जणांचे जबाब नोंदवून पूर्ण झाले आहे. आता या जबाबांचा अभ्यास केल्यानंतर एसआयटी आपल्या तपासाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.

- Advertisement -

बोरखेडच्या ‘या’ बहुचर्चित खुन प्रकरणात दोषारोपपत्र दाखलखानदेशचा हा आदिवासी युवक ठरणार पहिला एव्हरेस्टवीर

बीएचआर प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर यांना जामीनसाठी मदत करण्याच्या नावाखाली खंडणी मगितल्याप्रकारणी तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण, शेखर सोनाळकर यांच्यासह चाळीसगावचे उदय पवार यांच्याविरुद्ध सूरज सुनील झंवर यांनी तक्रार दिली. त्यानुसार डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा चाळीसगाव शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एसआयटी गठीत केली असून पथकाचे अधिकारी रविवारी चौकशीसाठी चाळीसगावात पोहोचले होते. ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून काही दस्तऐवज पुणे येथे पाठविल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यादृष्टीने एका ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये चौकशी करण्यात आली.

धुळ्याचे पारिजात व डॉ. गायत्री चव्हाण करणार ‘हा’ विश्वविक्रम

यांची नोंदविली साक्ष

एसआयटी स्थापन झाल्यानंतर तपास पथकाकडून फिर्यादी सुरज झंवर, सुनील झंवर, दीपक ठक्कर, तेजस मोरे, आयुष मणियार, विशाल पाटील यांचे जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. आता ते काम सुध्दा पूर्ण झाले आहे. सहाही लोकांच्या जबाबांचा आता एसआयटी अभ्यास करणार असून त्या अनुषंगाने पुढील तपासाची दिशा ठरविणार असल्याची माहिती तपास अधिकारी यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या