Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ खडसेंची उद्या ‘ईडी’ चौकशी

एकनाथ खडसेंची उद्या ‘ईडी’ चौकशी

मुंबई

पुण्यातील भोसरी येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची उद्या (15 जानेवारी) सक्तवसुली संचालनालय अर्थात

- Advertisement -

ईडीकडून चौकशी होणार आहे. चौकशीसाठी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. काही दिवसांपूर्वी खडसेंना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यामागे ईडीकच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ईडी च्या नोटिसीनंतर एकनाथ खडसेंची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आपली ईडीकडून चौकशी केली जाऊ शकते, असा अंदाज खडसेंनी याआधी व्यक्त केला होता.

त्यांनी ईडीची चौकशी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी भाजपला उद्देशून दिला होता. त्यामुळे आता खरंच एकनाथ खडसे सीडी लावतात का? आणि या सीडीतून कोणाचा भांडाफोड करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या