Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedभोंगा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीच 'राज'कारण

भोंगा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीच ‘राज’कारण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्यासह देशात भोंग्यावरून राजकारण तापलेले असतानाच आता भोंगा चित्रपट (Bhonga Movie) आता प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मनसेनेचे अमेय खोपकर (Amey Khopkar), संदीप देशपांडे (Sandip Deshpande), आणि अमोल कागणे (Amol Kagane films) फिल्मस् कडून तयार करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीयपुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील (Shivaji Patil) यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी राजकारण करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दुसरीकडे भोंगा’ चित्रपटाचे प्रदर्शन हा मनसेचा कमर्शिअल पब्लिसिटी स्टंट आहे असे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे…

- Advertisement -

ध्वनी प्रदूषण (noise pollution) कमी करण्यावर या चित्रपटात जोर दिला असून या पार्श्वभूमीवर हा ‘भोंगा’ चित्रपट चित्रित करण्यात आला. धर्मापेक्षा मोठं कोणी नाही मग कोणाच्या जीवाला धोका असला तरी चालेल या वृत्तीला दडपून टाकण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.

आपलं ते खरं करण्याची मानवी वृत्ती अशा या समस्यांना दुजोरा देत असल्याने बऱ्याचदा काही अनपेक्षित घटना डोळ्यासमोर घडताना दिसतात. ‘भोंगा धार्मिक नाही तर सामाजिक समस्या आहे’ हा आशयघन विषय या ‘भोंगा’ चित्रपटातून 3 मे रोजी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हा चित्रपट अमेय खोपकर, संदीप देशपांडे, आणि अमोल कागणे फिल्मस् प्रस्तुत असून चित्रपटाची निर्मिती निर्माते, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीयपुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली.

‘अमोल कागणे फिल्म्स’ प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि संवाद शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे लिखित असून चित्रपटातील गाणी विजय गटलेवार यांची असून गाण्याचे बोल सुबोध पवार लिखित आहेत. चित्रपटाचे संकलन निलेश गावंड यांनी केले असून या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी रामनी रंजन दास आणि वीरधवल पाटील यांनी उत्तमरीत्या पेलली आहे.

या चित्रपटात अभिनेत्री दिप्ती धोत्रे आणि अभिनेता कपिल गडसुरकर, अमोल कागणे, श्रीपाद जोशी, आकाश घरत, दिलीप डोंबे, सुधाकर बिराजदार, अरुण गीते, महेंद्र तिसगे, रमेश भोळे, दिपाली कुलकर्णी या कलाकारांचे अभिनय पाहायला मिळणार आहेत.

निर्माता, अभिनेता अमोल कागणेने याआधी ‘हलाल’, ‘लेथ जोशी’, बेफ़ाम ‘परफ्युम’ यासारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली होती, त्याच्या या ‘भोंगा’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेता सिनेमा, फिल्मफेअर बेस्ट फिल्म क्रिटिक 2022, इंडिअन इंटरनॅशनल बेस्ट फिल्म, पुणे इंटरनॅशनल बेस्ट मराठी फिल्म, महाराष्ट्र स्टेट अवॉर्डमध्ये बेस्ट फिल्म, बेस्ट डिरेक्टर, सोशल फिल्म अँड स्टोरी हे पुरस्कार या आशयघन चित्रपटाला मिळाले आहेत. याबाबत बोलताना अमोल कागणे असे म्हणाला की, ‘राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘भोंगा’ चित्रपट येत्या 3 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे याचा विशेष आनंद होत आहे, अजाणाची आशयघन कथा सर्व लोकांपर्यंत पोहचावी म्हणून हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करत आहोत.

‘भोंगा’ चित्रपटाचे प्रदर्शन हा मनसेचा कमर्शिअल पब्लिसिटी स्टंट आहे. चित्रपटाची पार्श्वभूमी मनसेने चांगली तयार केली. सामाजिक आणि धार्मिक तेढ याद्वारे भोंग्याला मनसेने चांगली प्रसिद्धी दिली. कमर्शियल काम कस करता येईल हे मनसेकडून शिकावे, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या