महसूल विजय सप्तपदीत 32 वर्षांनंतर भोकर-खोकर शीवरस्ता खुला

jalgaon-digital
2 Min Read

भोकर (वार्ताहर) –

गेल्या 32 वर्षापासून बंद पडलेला भोकर-खोकर हा शिवरस्ता खुला झाला. फटाक्यांची आतषबाजी फुग्यांची

कमान उभारत उत्साही शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांच्या हस्ते शिवरस्त्याचे उद्घाटन व फलकाचे अनावरण करून सर्वांनाच आचंबीत केले.

भोकर-खोकर शिवरस्ता गेल्या सुमारे 32 वर्षापासून बंद होता, अनेक शेतकर्‍यांना आपली जमीन कसण्यास अनंत अडचणी येत होत्या परंतू काहींच्या हट्टापुढे सर्वच हातबल झाले होते. याच दरम्यान सन 2009 मध्ये तत्कालीन आमदार स्व.जयंतराव ससाणे यांचे मार्गदर्शनाखालील ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच उत्तम पुंड यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता खुला करण्याचा प्रयत्न झाला. परंतू हा रस्ता खोकर-टाकळीभान रोडलगत भोकर-खोकर शिवरस्त्यालगत असलेले ‘भवानीमाता’ मंदिरापासून दक्षिणेकडील रस्ता त्यावेळी तत्कालीन अधिकार्‍यांनी संबधीत शेतकर्‍यांच्या मदतीने सुमारे दिड किमीचा शिवरस्ता खुला केला.

त्याच वेळी भवानीमाता मंदिरापासून उत्तेकडील शिवरस्ता ही खुला करण्यात आला परंतू काही शेतकर्‍यांच्या अडचणीमुळे काही दिवसांत हा उत्तरेकडील शिवरस्ता पुन्हा बंद पडला. पुन्हा परीसरातील सुमारे 80 लाभार्थी शेतकरी हातबल झाले. अनेक वर्ष प्रयत्न करूनही काही शक्य होईना, येथील जमीनी कसणे मुश्कील झाले होते.

दुसर्‍या पिढीतील युवा फळी पुढे सरसावली त्यात ग्रामपंचायत सदस्य राजु चक्रनारायण, सुभाष गिरमे, पवन सलालकर व अशोक चव्हाण यांनी पुन्हा प्रयत्न सुरू करत रस्ता खुला करण्याचा चंग बांधला. त्यास येथील उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसिलदार प्रशांत पाटील, मंडलाधिकारी जनार्दन ओहोळ, कामगार तलाठी ज्ञानेश्‍वर होडोळे व राजेश घोरपडे यांचे विशेष सहकार्य लाभले. अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू असतानाच सरकारकडून ‘महसुल विजय सप्तपदी अभियान’ सुरू झाले.

अखेर तहसिलदार प्रशांत पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे पा.नि.मसुद खान, भुमी अभिलेखचे उपअधिक्षक योगेश थोरात यांचेसह लवाजमा डेरेदाखल झाला आणी रस्ता खुला करण्याची प्रक्रीया झाली.

उपविभागीय अधिकारी पवार, राहुरीचे उपजिल्हाधिकारी डॉ.दयानंद जगताप, श्रीरामपूर तहसिलदार पाटील, राहुरीचे तहसिलदार फसियोद्दीन शेख, मंडलाधिकारी ओहोळ, कामगार तलाठी होडोळे, पोलीस पाटील डॉ. अनिकेत चव्हाण आदी मान्यवर उपस्थीत होते.

सुत्र संचालन सुदाम पटारे यांनी केले, तसेच रामचंद्र पटारे व पवन सलालकर यांनी अधिकार्‍यांचे व प्रशासनाचे आभार मानले. यावेळी सुभाष गिरमे, दादा गिरमे, जालींदर पटारे, पवन सलालकर, संदिप चव्हाण, एकनाथ चक्रनारायण, गुलाबभाई पठाण, ईस्माईल पठाण, ज्ञानदेव चक्रनारायण, उत्तम चक्रनारायण, बाबुराव चक्रनारायण, चांगदेव सलालकर, अशोक पटारे, वसंत शेरकर, गोरख सलालकर, सचीन सलालकर आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थीत होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *