Saturday, April 27, 2024
Homeजळगावभोईटे रेल्वेगेट वाहतुकीसाठी बंद

भोईटे रेल्वेगेट वाहतुकीसाठी बंद

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरापासून जवळच असलेल्या भोईटे रेल्वेगेटच्या पेव्हर ब्लॉकचे काम सुरु असल्याने गेल्या दोन दिवसांपासून हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

शहरात पिंप्राळा मार्गे येणार्‍या व जाणार्‍या नागरिकांना गेट बंद असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच सुरत गेट लाईनकडून येणार्‍यांना गेट जवळ आल्यानंतर मनस्ताप सहन करीत तेथून माघारी परतावे लागत असल्याची घटना गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांना अनुभवास मिळत आहे.

जळगाव-शिरसोलीमधील रेल्वे गेट क्र. 147 व काम सुरु असल्याने हे गेट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी 12 मार्चच्या सकाळी 8 वाजेपासून ते 13 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहील.

असे भोईटे गेट जवळ गेल्यानंतर वाहनधारकांना दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव रेल्वे स्टेशन परिसर ते भादली, शिरसोली या रेल्वे रुळावरील काम सुरु आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपुर्वी अचानकपणे भोईटे रेल्वे गेट जवळील पेव्हर ब्लॉक उखडून काढण्यात आला.

त्यामुळे वाहनधारकांना या मार्गावरुन येण्या-जाण्याचे अडचणीचे ठरले. गेल्या दोन दिवसांपासून गेट बंद असल्याने भोईटे गेट परिसरात पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम सुरु होते. सुरत रेल्वेगेट येथून दररोज हजारो वाहने ये-जा करीत असतात.

तसेच पिंप्राळा रेल्वे गेट बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. सध्या शहरात जनता कर्फ्यू असल्याने रेल्वे प्रशासनाकडून काम पूर्ण केले जात आहे. रेल्वे प्रशासनाने योग्य संधी साधत काम पूर्ण करीत असल्याने या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

दिवस-रात्र काम सुरु

पिंप्राळा उपनगर व शहराला जोडणारा पिंप्राळा गेट हा एकमेव मोठा मार्ग आहे. याठिकाणाहून दररोज दिवसरात्र सुमारे हजारो नागरिक प्रवास करीत असतात. हे गेट बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते.

या रेल्वे गेटवरील पेव्हर ब्लॉकची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याने नागरिकांना वाहने चालवितांना कसरत करावी लागत होती. मात्र दोन दिवसांपासून हे काम हाती घेण्यात आले असून दिवसासह रात्र पाळीत देखील हे काम पूर्ण केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या