Wednesday, April 24, 2024
Homeनगरभोगीच्या भाज्या शंभरीपार

भोगीच्या भाज्या शंभरीपार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

भोगीसाठी लागणार्‍या भाज्यांच्या दरात 20 ते 30 टक्क्याांनी वाढ झाली असून, बाजारात भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. घाऊक बाजारात भाज्यांची आवक अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने किरकोळ बाजारात भोगीच्या भाज्यांचे दर किलोमागे शंभरीपार गेले आहेत.

- Advertisement -

मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस, हवामानातील बदल तसेच अचानक वाढलेल्या थंडीमुळे भाज्यांची आवक कमी होत आहे. भाज्यांच्या लागवडीवरही परिणाम झाला आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात भोगीसाठी लागणार्‍या भाज्यांची आवक अपेक्षेएवढी झाली नाही. भाज्यांना मागणी वाढली असून, आवक कमी पडत आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचा बाजारात आवक कमी आहे. मटार, गाजर वगळता बहुतांश भाज्यांचे दर तेजीत आहेत.

गेले पंधरा ते वीस दिवस भाज्यांचे दर तेजीत आहेत. भोगीसाठी अनेक शेतकरी भाज्या राखून ठेवतात. भोगीच्या आधी दोन दिवस भाज्यांची तोडणी करून विक्रीस पाठविल्या जातात. मात्र, सध्या बाजारात भाज्यांची आवक अपुरी आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड़यात राज्यात वेगवेगऴया भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे लागवडीवर परिणाम झाला. जानेवारी महिन्यात अचानक थंडीत वाढ झाली. हवामानात होणार्‍या बदलांमुळे भाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे.

भाज्यांचे प्रतिकिलोचे दर

वांगी 80 ते 100 रुपये, मटार 60 ते 70 रुपये, गाजर 50 ते 60 रुपये, वाल 80 ते 100 रुपये, बोरे 80 ते 100 रुपये.

डिंगरीला आला भाव

आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने काल डिंगरीने चांगलाच भाव खाल्ला. सुरूवातीला 300 रूपये किलोने विकली जाणारी डिंगरी सायंकाळी 400 किलो भाव झाला होता. त्यामुळे भोगीसाठी ही भाजी लागत असल्याने काही महिलांनी छटाक घेणेच पसंत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या