Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedआज भोगी : 'न खाई भोगी तो सदा रोगी' म्हणूनच म्हटलं जातं

आज भोगी : ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ म्हणूनच म्हटलं जातं

नाशिक | प्रतिनिधी

‘न खाई भोगी तो सदा रोगी’ ही म्हण जुन्या लोकांकडून अनेकदा कानावर पडते. मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) आदला दिवस काय असतो? त्याला भोगीच का म्हणतात? असे एक ना अनेक प्रश्न पडणे स्वाभाविक आहे…

- Advertisement -

आज भोगीचा सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. आजच्या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टिक पदार्थ तयार करण्यात येतात. सर्वांच्या मध्ये प्रेम, आदरयुक्त भाव आणि माणुसकी निर्माण व्हावी या उद्देशाने हा सण साजरी केला जातो. राज्यात हा सण काही अंशी ग्रामीण भागात साजरी होतो तर शहरी भागात या सणाचा वेगळाच उत्साह दिसून येतो.

या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. तामिळनाडूमध्ये हा सण ‘भोंगीपोंगल’ म्हणून परिचित आहे. आसाममध्ये ‘भोगली बहू’, पंजाबमध्ये ‘लोहिरी’, राजस्थानमध्ये ‘उत्तरावन’ म्हणून साजरा केला जातो. असे म्हटले जाते की, ‘भोगी’ शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे असा होतो. म्हणून या सणाला आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानले जाते.

अशी आहे आख्यायिका

भोगीच्या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धर्तीवर उदंड पिके पिकवावी म्हणून प्रार्थना केली होती असे मानतात. ही पिके वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना आजच्या दिवशी केली जाते.

या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते.’भोगी’ हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे. या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहारलेले असले त्यामुळे आहारातही त्याचा तितक्याच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो. म्हणून या दिवशी ‘भोगी’ची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते.

महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला ‘खिंगाट’ म्हणतात. या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणार्‍या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खर्डा, सर्व शेंगभाज्या, पावटय़ाचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा बेत उपभोगायचा असतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या