Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रBhiwandi Building Collapse : भिवंडी इमारत दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू; 14 जणांना...

Bhiwandi Building Collapse : भिवंडी इमारत दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू; 14 जणांना बाहेर काढण्यात यश

मुंबई | Mumbai

भिवंडीतल्या वलपाडा (Bhivandi Valpada) परिसरात ३ मजली इमारत कोसळून आत्तापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 22 जणांपैकी 14 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीच्या ढिगाराखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मौजे कैलासनगर (वळपाडा) येथे वर्धमान कम्पाउंडमध्ये शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास इमारत कोसळली. ही इमारत G+2 अशी होती. त्यामध्ये दुसऱ्या मजल्यावर साधारण ३ ते ४ कुटुंब राहत होते. तर खालच्या मजल्यावर काही कामगार काम करत होते. दुपारी अचानक मोठा आवाज झाली आणि इमारत खाली कोसळली. इमारत कोसळल्यामुळे एकच गोंधळ उडाला असून इमारतीच्या ढिगाराखाली 15 जण अडकले गेले होते.

संजय राऊतांनी मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांच्या माध्यमातून…; नितेश राणेंचा खळबळजनक दावा

दरम्यान, आता या इमारत दुर्घटनेप्रकरणी, इमारतीचा मालक इंद्रपाल पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नारपोली पोलिसांनी इमारत बांधणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (२), ३३७, ३३८ आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांनी २०१४ मध्ये ही इमारत बांधली असून बहुतांश खोल्या दुकानदार आणि रहिवाशांना भाड्यानं देण्यात आल्या होत्या.

आतापर्यंत इमारत कोसळल्यानतंर ढिगार्‍याखालून एक महिला आणि लहान बाळाला बचाव पथकाने सुखरुप बाहेर काढले. मागील सहा तासात एकूण 11 रहिवाश्यांच्या सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर एकूण 4 रहिवाशांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून अजूनही शोधकार्य सुरू आहे.

Mann Ki Baat 100th Episode : ‘मन की बात’ माझ्या मनाची आध्यात्मिक यात्रा; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी केली पाहाणी

भिवंडीतील वलपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या नागरिकांना जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या.

त्याचबरोबर मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा खर्चदेखील राज्य शासनाच्या वतीने करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या