Friday, April 26, 2024
Homeनगरभिंगारमध्ये दारूच्या नशेत पतीकडून पत्नीचा खून

भिंगारमध्ये दारूच्या नशेत पतीकडून पत्नीचा खून

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंगार परिसरात पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात लोखंडी वॉल मारून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. गंगाधर नवनाथ लोंढे (वय 57, रा. प्लॉट नंबर 12, गणपती मंदिराजवळ, जामखेड रोड, ता. जि. नगर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. मंदा सुनील वैराळ असे मयत महिलेचे नाव आहे.

- Advertisement -

मंदा वैराळ यांचा पती आरोपी सुनील हिरामण वैराळ याला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली असून त्यालान्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. फिर्यादी गंगाधर लोंढे यांच्या घराच्या वरील मजल्यावर आरोपी सुनील वैराळ आणि मयत मंदा वैराळ त्यांच्या दोन मुली आणि एका मुलासह भाडेकरू म्हणून वास्तव्यास होते. सोमवारी रात्री सव्वाअकराच्या दरम्यान आरोपी सुनील वैराळ याने घरगुती वादाच्या कारणातून मंदा वैराळ यांच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी वॉल मारून खून केला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी आरोपी सुनील वैराळ याला अटक केली आहे. कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या