Friday, April 26, 2024
Homeनगरभिमा नदीपात्रात यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा

भिमा नदीपात्रात यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खेड (ता. कर्जत) येथील भिमा नदी पात्रातील जलाशयात यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणार्‍याविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करून चार जणांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

सुकरदी मंजुर शेख (वय 32), फारूख रोहिम शेख (वय 32, दोघे रा. पहाडगाव, ता. उधवा, जि. साहेबगंज, राज्य झारखंड, हल्ली रा. खेड ता. कर्जत), रफिकूल ऊर्फ इस्माल मुस्ताफा शेख (वय 30) व रेजाऊल माजद शेख (वय 24, दोघे रा. बाघपिंजरा, ता. मोहनपुरा, जि. साहेबगंज, राज्य झारखंड, हल्ली रा. खेड, ता. कर्जत) यांना अटक केली आहे, तर यांत्रिकी बोटीचे मालक तेजस मोरे (रा. खेड, ता. कर्जत) व चाँद शेख (रा. वाटलुज, ता. दौंड) हे पसार झाले आहेत.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरूध्द कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखी दोन पथके स्थापन करण्यात आले आहेत. तेजस मोरे व चाँद शेख हे परप्रांतीय मजुरांचे सहाय्याने खेड गावचे शिवारातील भिमा नदी पात्रातील जलाशयात यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन व वाळू वाहनात भरुन वाहतूक करत आहे.

अशी माहिती पोलीस निरीक्षक कटके यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार अंमलदार सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, शंकर चौधरी, रोहित मिसाळ, विनोद मासाळकर, योगेश सातपुते व चंद्रकांत कुसळकर यांनी खेड येथे नदीपात्रा जवळ जाऊन स्पिडबोट सोबत घेऊन अवैध वाळू उत्खनन करणार्‍या बोटीचा शोध घेतला असता खेड गावच्या शिवारात भिमानदी पात्रात यांत्रिकी बोट व सेक्शन पंपाच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे दिसले. पथकने छापा टाकून बोटीवरील इसमांना ताब्यात घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या