Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याभिडे वाडा स्मारकप्रश्नी तत्काळ बैठक घेणार - मुख्यमंत्री

भिडे वाडा स्मारकप्रश्नी तत्काळ बैठक घेणार – मुख्यमंत्री

नागपूर | प्रतिनिधी Nagpur

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule )यांनी पुण्यातील ज्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या भिडेवाडा स्मारक प्रश्नी राज्य सरकार गंभीर असून त्यावर तत्काळ बैठक घेऊन मार्ग काढला जाईल. याशिवाय स्मारकासाठी जे पैसे लागतील ते पैसे खर्च केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

- Advertisement -

भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन याठिकाणी सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे आढाव यांच्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधले.

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करून याठिकाणी सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्यात यावी, यासाठी बाबा आढाव यांच्यासह अनेक जण उपोषणाला बसले आहेत. सरकारने बाबा आढाव यांच्या वयाचा विचार करता ताबडतोब भिडे वाड्याच्या स्मारकाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी भुजबळ यांनी केली. त्यावर स्मारक प्रश्नी तत्काळ बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या