Saturday, April 27, 2024
Homeनगरभेंडा सजातील चार गावांचे पीक पंचनामे अंतिम टप्प्यात

भेंडा सजातील चार गावांचे पीक पंचनामे अंतिम टप्प्यात

भेंडा |वार्ताहर| Bhenda

भेंडा तलाठी सजातील भेंडा बुद्रुक,भेंडा खुर्द, सौंदाळा व गोंडेगाव या चार गावांतील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या

- Advertisement -

पिकांचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून आज अखेर 627 शेतकर्‍यांच्या 394.5 हेक्टर क्षेत्रातील पीक पंचनामे पूर्ण झाले आहेत.

तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी शेखर शेलार व तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांच्या संयुक्त सहीने दि. 20 ऑक्टोबर रोजी नेवासा तालुक्यातील सर्व तलाठी, सर्व कृषी सहाय्यक, सर्व ग्रामसेवकांना दि.1 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाचे नुकसानीचे पंचनामे करणेबाबत आदेश दिलेले आहेत.

त्या आदेशानुसार भेंडा तलाठी सजाच्या अंतर्गत येणार्‍या भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, सौंदाळा व गोंडेगाव या चार महसुली गावांतील पिकांचे तलाठी विजय जाधव, कृषी सहाय्यक श्रीमती किरण शेवाळे, भेंडा बुद्रुकचे ग्रामविकास अधिकारी रेवणनाथ भिसे, भेंडा खुर्दच्या ग्रामसेविका श्रीमती सरिता थिटे, कोतवाल सुभाष महाशिकारे यांचे पथक थेट शेतात जाऊन पंचनामे करीत आहे.

काल बुधवार अखेर भेंडा बुद्रुक गावातील 189 बाधित खातेदारांच्या 153.50 हेक्टर बाधित क्षेत्रातील पिकांचे, भेंडा खुर्द मधील 67 बाधित खातेदारांच्या 42.90 हेक्टर बाधित क्षेत्रातील पिकांचे, सौंदाळा गावातील 116 बाधित खातेदारांच्या 60.35 हेक्टर बाधित क्षेत्रातील पिकांचे तर गोंडेगाव मधील 255 बाधित खातेदारांच्या 137.75 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. अजूनही पंचनामे करण्याचे काम सुरू असून पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती तलाठी विजय जाधव यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या