Friday, April 26, 2024
Homeनगरभेंडा-कुकाणा पाणी योजना व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी 'यांची' झाली निवड

भेंडा-कुकाणा पाणी योजना व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ‘यांची’ झाली निवड

भेंडा | प्रतिनिधी| Bhenda

येथील भेंडा-कुकाणा व इतर सहा गावांच्या पिण्याचे पाण्यासाठीच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या व्यवस्थापनासाठी असलेल्या

- Advertisement -

श्रीसंत ज्ञानेश्वर संयुक्त पाणी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भेंडा बुद्रुकच्या सरपंच सौ. वैशाली शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष पदी आंतरवालीचे सरपंच संदीप काकासाहेब देशमुख तर सचिव पदी कुकाणा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आर.एन.गायके यांची निवड झाली आहे.

भेंडा बुद्रुक येथे लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे दूरदृष्टीतुन व माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे प्रयत्नाने 1999-2000 मध्ये भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, कुकाणा, तरवडी, चिलेखनवडी व आंतरवाली या सहा गावांची प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना उभी राहिलेली आहे.

या सहा गावांबरोबरच टंचाईच्या काळात याच पाणी योजनेतून नेवासा तालुक्यातील 50 टक्के गावांना टँकर व्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सक्षमपणाने सुरू असलेल्या आणि नफ्यात असलेल्या जिल्ह्यातील काही निवडक पाणी पुरवठा योजने पैकी ही एक योजना आहे.

या सहा गावाचे सरपंच व ग्रामसेवक या पाणी व्यवस्थापन समितीचे सदस्य असतात. कोणत्याही ग्रामपंचायतीचा सरपंच अध्यक्ष-उपाध्यक्ष व एक ग्रामसेवक सचिव अशी तरदूत आहे.

अलिकडे भेंडा बुद्रुक, कुकाणा व तरवडी या ग्रामपंचायतीच्या निवडणूक होऊन सरपंच बदलल्याने नवीन सरपंच व ग्रामसेवक या संयुक्त पाणी व्यवस्थापन समितीचे सदस्य झालेले आहेत.

माजी आमदार पांडुरंग अभंग, पंचायतचे माजी उपसभापती काशिनाथ नवले,तुकाराम मिसाळ यांचे मार्गदर्शनाखाली पाणी व्यवस्थापन समितीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली व नवीन निवडीचे पत्र नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे,उपसभापती किशोर जोजार व गटविकास अधिकारी शेलार यांना देण्यात आले.

यावेळी भेंडा बुद्रुक च्या सरपंच सौ वैशाली शिंदे,भेंडा खुर्दचे सरपंच सुनील खरात,कुकाण्याच्या सरपंच सौ.लताताई अभंग, तरवडीचे सरपंच जालिंदर तुपे, चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब सावंत,आंतरवालीचे सरपंच संदीप देशमुख असेच बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजी शिंदे, अमोल अभंग, सोमनाथ कचरे आदी उपस्थित होते. निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

पाणी व्यवस्थापन समितीचे नवीन पदाधिकारी असे….

अध्यक्ष – सौ.वैशाली शिवाजी शिंदे

उपाध्यक्ष – श्री.संदिप काकासाहेब देशमुख

सचिव- आर.एन. गायके

सदस्य – लताबाई विठ्ठल अभंग, सुनिल शाबाजी खरात, जालिंदर भाऊराव तुपे, भाऊसाहेब धोंडीराम सावंत, बाबासाहेब भाऊराव घुले, आर.टी.भिसे, बी. एस. महाजन, एस. एल. गोरे, पी. एस. भगत, सौ. एस.एन. थिटे.

- Advertisment -

ताज्या बातम्या