भेंडा-कुकाणा पाणी व्यवस्थापन समितीच्या कामकाजाच्या माहितीसाठी उपोषण सुरू

jalgaon-digital
2 Min Read

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

तालुक्यातील भेंडा येथे असलेल्या भेंडा-कुकाणा व इतर सहा गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या संत ज्ञानेश्वर पाणी व्यवस्थापन समितीच्या कामकाजाची माहिती मिळावी या मागणीसाठी कुकाणा येथील सामाजिक कार्यकर्ते मुकुंद तुकाराम अभंग यांनी नेवासा पंचायत समितीसमोर अर्ध नग्न अवस्थेतील एक दिवसीय उपोषण सुरू केले आहे.

विस्तार अधिकारी पंचायत समिती नेवासा यांना दिलेल्या निवेदनात श्री.अभंग यांनी म्हंटले आहे की,आपल्या कार्यालयास दि.24 सप्टेंबर रोजी भेंडा-कुकाणा व सहा गावांचे पाणी पुरवठा योजनेबाबत सविस्तर निवेदन दिले होते. परंतु अद्याप ही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसून नागरिक शुष्द पिण्यापासून वंचित आहे. या अनुषंगाने दि.02 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंधेला दि.01 रोजी आपल्या कार्यालयाच्या गेट समोर सकाळी 9.30 ते सायं 5 या कालावधीत सोशल डिस्टंसिंगचे पालन करत अर्धनग्न अवस्थेत उपोषण करून संत ज्ञानेश्वर संयुक्त पाणी व्यवस्थापन समितीच्या फ्लेक्स प्रतिभेस संध्यापात्राने अभिषेक घालून निषेध करणार आहे.

उपोषणकर्त्याच्या प्रमुख मागण्या…

तसेच सर्व गावांचे पिण्याचे शुध्द पाणी आज सोडण्यात यावे, संत ज्ञानेश्वर पाणी व्यवस्थापन समितीचा सन 2020 पर्यंत 10 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट मिळावा, भेंडा बुद्रुक,कुकाणा,तरवडी या ग्रामपंचायतवर सध्या प्रशासक नियुक्त आहेत, त्यामुळे संत ज्ञानेश्वर पाणी व्यवस्थापन समितीस पाणी वाटपाचा अधिकार राहिलेला नसतांना देखील कामकाज कुठल्या आधारे करत आहे याचे लेखी उत्तर मिळावे,सहा गाव पाणी पुरवठा योजनेवर दि .02 ऑक्टोबर 2020 पासून प्रशासक नियुक्त करण्यात यावा,संत ज्ञानेश्वर पाणी व्यवस्थापन समितीचे दि .02 ऑक्टोबर 2020 पर्यंतचे बँक स्टेटमेंट मिळावे,सहा गावातील पाणीपट्टी भरणारे नळधारक नागरिक व पाणीपट्टी थकबाकी असलेले नळधारक नागरिक यांची दि.2 ऑक्टोबर पर्यंत सुची मिळावी, संत ज्ञानेश्वर पाणी व्यवस्थापन समितीत कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुची , त्यांचे मासिक पगार व संस्थेने दरवर्षी खर्च केलेल्या पैशांचा हिशोब मिळावा, समितीची घटना नियमावलीची साक्षांकित प्रत तसेच संस्था महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागात दप्तरी नोंद केलेली आहे त्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत दि.02 ऑक्टोबर पर्यंत मिळावी अशा मागण्या उपोषकर्ते मुकुंद अभंग यांनी केलेली आहे.

कुकाण्याच्या पाणी पुरवठा सुरू…

दरम्यान दि.18 सप्टेंबर पासून बंद असलेला कुकाणा गावाचा नळ पाणी पुरवठा दि.30 सप्टेंबर मध्यरात्री पासून सुरू करण्यात आल्याची माहिती पाणी व्यवस्थापन समिती कडून मिळाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *