Thursday, April 25, 2024
Homeनगरभेंडा-जेऊर परिसरातील जनावरांचे मृत्यू घटसर्पामुळेच

भेंडा-जेऊर परिसरातील जनावरांचे मृत्यू घटसर्पामुळेच

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata

नेवासा तालुक्यात मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचे निष्कर्ष प्राप्त झाले असून या गायींचा मृत्यू घटसर्पामुळे असल्याची माहिती नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे यांनी दिली. लवकरात लवकर जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

सभापती रावसाहेब कांगुणे, पं.स. सदस्य बाळासाहेब सोनवणे, पशुधन विकास अधिकारी डॉ.दिनेश पंडुरे, कुकाणा येथील पशुधन विकास अधिकारी डॉ.अमोल गायकवाड यांनी भेंडा व जेऊर परिसरात लाळ्या खुरकुत व घटसर्प या आजाराने बळी पडलेल्या पशुपालकांच्या घरी भेटी दिल्या. याबाबतीत त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या आजारामुळे फुफ्फूसदाह होऊन जनावरे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी लसीकरण भेंडा, कुकाणा, जेऊर, नांदूर शिकारी, तरवडी, देडगाव येथे करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या