भेंडा बुद्रुकच्या उर्वरीत चार जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात

jalgaon-digital
1 Min Read

भेंडा |वार्ताहर| Bhenda

नेवासा तालुक्यातील निर्मलग्राम भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या 17 पैकी 13 जागा बिनविरोध निवडून आल्या असल्या तरी

उर्वरित 4 जागांसाठी 11 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

गावातील सर्व राजकीय गट एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. त्याला 75 टक्के यश मिळाले.प्रभाग क्रमांक 1 मधील 3 जागा, 2 मधील 3 जागा, 3 मधील 2 जागा, 4 मधील 2 जागा, 5 मधील 1 जागा तर 6 मधील 2 जागांवरील एकूण 13 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर प्रभाग क्रमांक 4 मधील 1 जागा, 5 मधील 2 जागा व 6 मधील 1 जागेसाठी निवडणूक होत आहे.

रिंगणातील उमेदवार- प्रभाग 4 मधील अनुसूचित स्त्री राखीव उमेदवार- मंगल अरुण गोर्डे (एकत्रित गट) व रिटा मायकल गोर्डे (अपक्ष). प्रभाग 5 मधील सर्वसाधारण जागेवरील उमेदवार दादासाहेब हौशीराम गजरे (एकत्रित गट), मच्छिंद्र सखाराम वाघडकर (अपक्ष), संदीप भगवान पाखरे (अपक्ष).

अनुसूचित स्त्री राखीव उमेदवार- शांताबाई भगवान गालफाडे (एकत्रित गटाच्या उमेदवार) व लताबाई यडू सोनवणे (अपक्ष). प्रभाग 6 मधील सर्वसाधारण जागेवरील उमेदवार- अण्णासाहेब विठ्ठल गव्हाणे (एकत्रित गट), दिलीप कचरू यादव (अपक्ष), सचिन पोपट फुलारी (अपक्ष), रामदास गहिनीनाथ वाघमारे (अपक्ष).

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *