Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधजन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून – सौ. वंदना अनिल दिवाणे

22 ऑक्टोबर –

- Advertisement -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्शल, सूर्य, शुक्र , शनीग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य वृश्चिक आहे. हर्शल आणि शनिच्या एकत्रित प्रभावामुळे वैयक्तिक भावी घटनांवर काहीच नियंत्रण ठेवता येणार नाही. शुक्र कमजोर असल्यामुळे प्रेमविवाहाच्या बाबतीत अनेक विचीत्र अनुभव येतील. शिवाय विचित्र सहकारी अनेक वेळा अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करतील. जीवनाच्या पूर्वार्धात आर्थिक प्रगतीत फार अडचणी येतील. उत्तरार्धात मात्र आर्थिक सुस्थिती राहील.

23 ऑक्टोबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनी, शनि, मंगळ, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. प्रबळ शनीच्या प्रभावामुळे प्रेमाच्या बाबतीत बरेच खाचखळगे अनुभवास येतील. दुसर्‍यासाठी जीवापाड मेहनत करून व मोठा त्याग करूनही ज्यांच्यावर उपकार केला त्यांच्याकडून प्रेमाचा शब्द ऐकावयास मिळणार नाही. त्यामुळे तुमची असामान्य बुद्धीमत्ता कुचकामी ठरेल. विचार फार उच्च असून कोणत्याही प्रकारचा खालच्या दर्जाचा थिल्लरपणा तुम्हाला आवडणार नाही. तुमच्या सल्ल्याने अनेक लोक श्रीमंत होतील. तोच सल्ला स्वतःसाठी वापरल्यास उत्तम आर्थिक स्थिती प्राप्त होईल.

24 ऑक्टोबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, शुक्र, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. शुक्राच्या प्रभावामुळे मित्रांची संख्या फार मोठी असेल. शुक्र प्रभावामुळे अनेक प्रेमप्रकरणे संभवतात. त्यातून प्रेमात पडणे याचा अर्थ कळून येईल. साहित्य, संगीत, चित्रकला, काव्य, नाटक अशा प्रकारच्या फाईन आर्ट्समध्ये उत्तम यश मिळू शकेल. आर्थिक गुंतवणूक आणि योजनाबद्ध उद्योगातून आर्थिक यश मिळण्याच्या बाबतीत अतिशय भाग्यवान आहात.

25 ऑक्टोबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शनि, शुक्र्र, सूर्य, हर्शल या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य वृश्चिक आहे. अतिशय विलक्षण आणि तीक्ष्ण बुद्धीमत्ताचे धनी आहात. एक पथ्य पाळल्यास जीवनाचे सोने करू शकाल. ते म्हणजे समतोल राखण्याच्या बाबतीत स्वतःवर कडक नियंत्रण ठेवणे होय. प्रतिभेचा स्पर्श झालेली त्यांची लेखणी काव्य, साहित्य, यासारख्या कलात असामान्य यश मिळेल. आर्थिक स्थिती सदैव वरखाली होत राहील. काही दिवस श्रीमंती तर काही दिवस गरिबी असे चक्र अव्याहतपणे चालू राहील.

26 ऑक्टोबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शुक्र, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. वारसा हक्काने मिळालेली संपत्ती असल्यास किंवा ज्या कामात जास्त कष्ट करावे लागत असल्यास जीवन सुखात जाईल. बुद्धीमत्ता तीक्ष्ण आहे. गंभीर विषयाचा सखोल अभ्यास करण्यात जास्त रस वाटेल. आर्थिक बाबतीत वर सांगितल्याप्रमाणे वारसाहक्काने मिळालेली संपत्ती असल्यास तुमचे जीवन सुखात जाईल.

27 ऑक्टोबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, शनी, मंगळ ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. मंगळाचा प्रभाव करिअरच्या दृष्टीने जीवनात फार महत्वाचा राहील. उतावळेपणामुळे त्वरीत निर्णय घेतल्याने आणि वादविवादाची हौस असल्याने अनेक शत्रु निर्माण होतील. असे होऊ नये म्हणून इतरांशी वागतांना चातुर्याचा उपयोग करण्याची सवय लावून घेणे चांगले. वकिलीमध्ये उत्तम यश मिळेल व त्याच प्रमाणात भरपूर पैसा मिळेल.

28 ऑक्टोबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य हर्षल, शनी, मंगळ ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. जीवनावर शनीचा मोठा प्रभाव राहील. समाजामध्ये महत्व प्राप्त होईल. सूर्याच्या प्रभावामुळे तुम्ही न्यायशील बनाल. इतरांच्या भांडणात शांतिदूताची भूमिका बजावून त्यांच्यात समेट घडवून आणाल. दुसर्‍यांसाठी तुम्ही वाटेल तो त्याग करायला तयार असाल. आर्थिक सुस्थिती प्राप्त होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या