Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधबलवान गुरूची साथ...रवीरेषेच्या शुभत्वाची जोड !

बलवान गुरूची साथ…रवीरेषेच्या शुभत्वाची जोड !

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड-8888747274

रवीशंकर यांचा जन्म 13 मे 1956 रोजी तामिळनाडुतील पापानासम या गावात झाला, रवीशंकर यांचे पहिले गुरु सुधाकर चतुर्वेदी होते वेदशास्त्रात निपुण असलेले चतुर्वेदी हे महात्मा गांधी यांचे निकटचे स्नेही होते.

- Advertisement -

श्री रवीशंकर यांचे बेंगलोर येथे महाविद्यलयीन शिक्षण झाले त्यांनी तेथून शास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना दुसरे गुरु महाऋषी महेश योगी लाभले. श्री श्री रवीशंकर हे वेदशास्त्र, ध्यान धारणा व आयुर्वेद या विषयावर व्याख्याने देऊ लागले, पुढे त्यांनी ध्यान धारणा व आयुर्वेदाच्या प्रसारासाठी निरनिराळ्या ठिकाणी शाखा स्थापन केल्या.

1980 पासून श्री रवीशंकर यांनी ध्यानधारणाची अनुभूती घेण्यासाठी जागतिक स्तरावर कार्यशाळा घेतल्या. त्यांनी श्वासोश्वासाची लयबद्ध क्रिया शोधली त्याला त्यांनी सुदर्शन क्रिया हे नाव दिले. सुदर्शन क्रिया त्यांनी वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी शिमोगा कर्नाटका येथे भद्रा नदीच्या काठी 10 दिवसाचे मौन व्रत धारण करून तपश्चर्येने शोधून काढली.

1983 साली रवीशंकर यांनी स्विर्त्झलँण्ड या देशात पहिली आर्ट ऑफ लिव्हिंगची कार्य- शाळा घेतली, त्यानंतर त्यांनी संपूर्ण अमेरिकेत प्रवास करून आर्ट ऑफ लिव्हिंग या ध्यानधारणा क्रियेचा प्रचार व प्रसार केला.

श्री रवीशंकर यांना अध्यात्माद्वारे मनुष्याला प्रेम, करुणा आणि उत्साह हा सुदर्शन क्रियेतून मिळविता येतो व हे मिळविता येताना त्याआड जात, धर्म व पंथ येत नाहीत.

श्री रविशंकर यांनी पाकिस्तानातील इस्लामाबाद व कराची येथे 2004 मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग चे सेंटर स्थापन केले पण ते 2014 मध्ये अतिरेक्यांनी उध्वस्त केले. काश्मीर, मणिपूर येथे शांतता वार्तेमध्ये ते सामील होते. तसेच आयोध्यामधील राम मंदिर निर्माणाच्या हेतूने त्यांनी मुस्लिम व हिंदू नेत्यांशी समझोता वार्ता केल्या होत्या. कैद्यांसाठी त्यांनी तुरुंगामध्ये जाऊन अध्यात्माचे धडे दिले.

श्री रवीशंकर यांना खूप मान-सन्मान मिळाले त्यापैकी उल्लेखनीय जानेवारी 2016 मध्ये भारताचे पद्म विभूषण, कोलंबिया व ब्राझील या राष्ट्रांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 2012 मिळाला.

श्री.श्री. रविशंकर यांच्या हातावरील गुरु ग्रह प्रभावी व भाग्यविधात्या रेषांचे विवेचन

हातावरील गुरु ग्रह बलवान आहे, भाग्य रेषा मनगटापासून उगम पाऊन अखंड शनी ग्रहावर गेलेली व शनी ग्रहावर त्रिशुलात्म झालेली भाग्य रेषा, तिचा एक फाटा गुरु ग्रहावर, मधला शनी ग्रहावर व तिसरा रवी ग्रहाकडे गेलेला असल्याने अध्यात्मिक व शास्त्रीय बैठकीवर आधारित तत्वज्ञान, त्यातून आर्थिक आवक, तत्वज्ञान व हुशारीमुळे व रवी ग्रहाच्या प्रभावामुळे सभा, व्याख्याने जागतिक स्थरावर मान-सन्मान व कीर्ती देतात. या भाग्य रेषेला रवी रेषेच्या शुभत्वाची जोड, या दोन रेषांनी श्री श्री रवीशंकर यांचा भाग्योदय घडविला.

भाग्यरेषा अति उत्तम व शुभत्व लाभलेली त्यातूनच बुध रेषा बुध ग्रहावर गेलेली, त्यामुळे आयुष्यात समयसूचकता अचूक निर्णय यांची जोड मिळाली. मस्तक रेषा चंद्र ग्रहावर उतरलेली त्याच्या खालीच अजून एक मस्तक रेषेचा तुकडा जो अंतर्ज्ञान बहाल करतो आहे. वरच्या मंगळ ग्रहावरून दोन रेषा रवी व बुध ग्रहाच्यामध्ये मार्गस्थ झालेल्या या रेषा वरच्या मंगळ ग्रहाचे बळ वाढवितात व युक्तीने, हुशारीने व शांत चित्ताने निर्णय घेण्याची क्षमता वाढवितात.

हातावरील गुरु ग्रहाचे कारकत्व

गुरु उंचवटा – गुरु उंचवटा बलवान व प्रभावी असल्याने, गुरु तत्वाच्या गुणधर्माची वैशिष्टे दिसून येतात.

गुणधर्म – सभ्य, सुसंस्कृत, संस्कारक्षम, आदशर्र् मानवी जीवनाची मुल्ये जपणारा, स्व:कर्तृत्वावर मोठे होणारे हे लोक असतात. सर्वसाधारणपणे वयाच्या चौदाव्या वर्षापासून यांच्यातला हुडपणा कमी व्हायला लागतो व जीवनातील महत्वाकांक्षा व

मोठे होण्यासाठी ते ध्येयाने प्रेरित होतात. महत्वाकांक्षा साध्य होण्यासाठी जिद्दीने कामाला लागतात.

गुरु प्रधान व्यक्तीचे आचरण नैतिक मुल्यांवर आधारीत असल्यामुळे ते शुद्ध, चोख निरुपद्रवी व निर्मळ स्वभावाचे असतात. महत्वाकांक्षा सफल होण्यासाठी आपल्यापुढे श्रेष्ठ आदर्श ठेवतात. सुव्यवस्था, सूत्रबद्धता, वक्तशीरपणा, निटनेटकेपणा, टापटीप, स्वच्छता, शिस्तबध्दता, यांचे हे लोक कट्टर भोक्ते असतात. हे लोक भावनाप्रधान, हळूवार, प्रेमळ, कनवाळू, आतिथ्यशील, उदार व उमद्या स्वभावाचे असतात.

सार्वजनिक जीवनात हे लोक पुढे असतात व सामाजिक जीवनात दादागिरी गाजविण्याची खूमखूमी या लोकात असते. सार्वजनिक क्षेत्रात नावलैकिक मिळावा, प्रतिष्ठा व दबदबा निर्माण करण्यास हे लोक उत्सुक असतात, महत्वाकांक्षेने प्रेरित होऊन ते काम करीत असतात.

सार्वजनिक क्षेत्रात या व्यक्ति चमकतात, यशस्वी होतात आणि कीर्ती मिळवितात. या लोकात संघटन व नेतृत्वकौशल्याच्या गुणांमुळे ते सामाजिक क्षेत्रात पुढारीपणा करतात. सार्वजनिक जीवनातील यांच्या कल्याणकारी भूमिकेमुळे सार्वजनिक क्षेत्रात यश मिळवितात. हे लोक आचरणाने, शुध्द, निःसंकोची, निष्कलंक, र्निव्यसनी व पवित्र असतात, त्यामुळे जनसामान्यात यांच्याबद्दल आदर असतो. एक आदर्श, प्रतिष्ठित मानवी मुल्यांचे जतन करणारे म्हणून गुरु प्रभावी लोक ओळखले जातात.

- Advertisment -

ताज्या बातम्या