Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधबॉलिवूडचा भाईजान

बॉलिवूडचा भाईजान

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता सलमान खान 27 डिसेंबर, 1965 रोजी जन्म झाला. सलमान खानने वयाच्या 23 व्या वर्षी 1988 मध्ये बीवी हो तो ऐसी या हिंदी चित्रपटातील छोटेखानी भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

1989 साली सलमानाने प्रमुख नायकाची भूमिका साकारलेल्या मैने प्यार किया या हिंदी चित्रपटाने प्रचंड व्यावसायिक यश कमवले व त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार त्याला मिळवून दिला. त्यानंतर साजन, हम आपके हैं कौन, करण अर्जुन, जुडवा, प्यार किया तो डरना क्या व बीवी नं. 1 या इ.स.1990 च्या दशकात गाजलेल्या चित्रपटांत त्याने अभिनय केला.

- Advertisement -

अतिथि-भूमिकेसाठी कुछ कुछ होता है ह्या सिनेमासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील पटकथालेखक सलीम खान हे त्याचे वडील तर अरबाझ खान, सोहेल खान हे त्याचे भाऊ आणि बहीण अर्पिता असे आहेत.

2011 मध्ये त्याने स्वत:ची निर्माण कंपनी सुरू केली. सलमान खान यांनी निर्माता म्हणून चिल्लर पार्टी हा सलमान खानचा पहिला चित्रपट आहे. ह्या चित्रपटाला 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्याला अनेक नावाने ओळखले जाते.

दबंगखान, टायगर खान, भाईजान, सल्लूभाई इत्यादी. सलमान खान यांनी छोट्या पडद्यावर बिग बॉस या सोनी टी व्ही मालिकेचे सूत्र संचलन करत असून त्यांनी या मालिकेद्वारे खूप प्रसिद्धी मिळवली आहे. सलमान खान मागील तीस वर्षांपासून चंदेरी दुनियेतील एक बहुुचर्चित अभिनेता आहे.

जो दानशूर म्हणून प्रसिद्ध आहे. सलमान यांचे लग्नाबाबत अजूनही वावड्या उठत असतात परंतु सलमानने अजून लग्न केले नाही. आता वयाच्या 55 वर्षानंतर सलमान लग्नाचा विचार करेल का? का कायमचा अविवाहित राहील याबद्दलच्या लोकांच्या मनात जिज्ञासा आहे.

हस्तसामुद्रिकदृष्ट्या विचार केला तर विवाह कधी होईल याच्या अचुकतेपेक्षा, वैवाहिक सौख्य कधी व वयाच्या कुठल्या वयापासून व ते किती दिवस मिळेल हे ठामपणे सांगता येते. हस्तसामुद्रिकदृष्ट्या करंगळीच्या खाली हृदय रेषेच्या वर हाताच्या बाहेरून आत येणारी एक ते दोन सेन्टीमीटरची रेषा ही विवाह रेषा होय.

ही बुध ग्रहावर विराजमान असते व विवाह रेषा एक ते चार संख्येनेेही सापडू शकतात. एकापेक्षा जास्त विवाह रेषा हातावर असल्यास तितके विवाह होत नाहीत, मात्र दोन तीन व्यक्तींशी वैवाहिक संबंध येऊ शकतात, याच्या सत्यतेसाठी गुरु ग्रह, हृदय रेषा व मस्तक रेषा तपासावी लागते व नंतरच अचूक निदान करता येते.

विवाह संस्कार हा मानवाने समाज व चालीरीतीनुसार बनविला गेला आहे, प्रत्येक समाजातील मान्यतेनुसार विवाह विधी व सोपस्कार आहेत. हस्तसामुद्रिकदृष्ट्या विवाह रेषा ज्या वय वर्षात हातावर असते त्या वय वर्षात स्त्री व पुरुषांचे कायम स्वरूपी शारीरिक संबंध येतात किंवा येऊ शकतात. आजकाल लिव्ह इन म्हणजे लग्नविधीचे सोपस्कार न करता नवरा बायकोसारखे एकत्र राहाण्याचा प्रकार वाढत चालला आहे.

ज्या मुला मुलींना लग्न करून संसार करायचा नसतो, ज्यांना मुलांनी जवाबदारी घ्यायची नाही, चूल मूल यामध्ये ज्या स्त्रीला अडकायचे नाही, अथवा पुरुषाला संतती नको आहे ते लिव्ह इन मध्ये राहतात, लिव्ह इन सुद्धा कायमस्वरूपी असण्याचे कारण नाही, एकमेकांशी पटले नाही की वेगळे होण्यास त्यांना कुठल्याही कायद्याची आडकाठी वा सामाजिक बंधन नसते.

मात्र दोन तीन व्यक्तींशी वैवाहिक संबंध येऊ शकतात, याच्या सत्यतेची साठी गुरु ग्रह, हृदय रेषा व मस्तक रेषा तपासावी लागते व नंतरच अचूक निदान करता येते. सलमान यांचे नाव ऐश्वर्या राय, कतरीना कैफ पासून अनेक नट्यांशी जोडेल गेले, परंतु सलमान यांच्या डाव्या हातावर हृदय रेषा नाही, हृदय रेषा हातावर नसेल तर असे लोक एखाद्यावर अति प्रेम करणारे किंवा अति द्वेष करणार्‍या स्वभावाचे असतात, ह्या स्वभावामुळे त्यांच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही आणि यांची स्वार्थी वृत्ती असते. डाव्या हातावर हृदय रेषेचा अभाव आहे परंतु उजव्या हातावर हृदय रेषा आहे त्यामुळे हृदय रेषेच्या अभावाचा पन्नास टक्के प्रभाव सलमान यांच्या स्वभावात आहे.

सलमान भाग्यवान आहेत त्यांची भाग्य रेषा आयुष्य रेषेतून उगम पावते आहे, तसेच पंजापेक्षा बोटे मोठी आहेत त्यामुळे मागचा पुढचा विचार न करता त्वरित निर्णय घेतात. हात स्वच्छ आहे हातावर आडव्या तिडव्या रेषा नाहीत,हातावरील सर्व पेरे उत्तम आहेत, मस्तक रेषा चंद्र ग्रहाकडे वळाली आहे, त्यामुळे ते मोठे कलाकार आहेत. काळवीट हरणाची शिकारीमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यानंतर सलमान यांनी फिरोजा रत्न परिधान करण्यास सुरवात केली. सलमान खान हे फिरोजा रत्न ब्रेसलेट मध्ये वापरतात.

सलमान यांच्या उजव्या हातात फिरोजा रत्नाचे रत्नजडित साखळीचे आभूषण आहे व ते नेहमी वापरात असतात, तर या फिरोजा रत्नाचे गुणधर्म बघू यात. फिरोजा रत्न सामाजिक स्थिती व मान सन्मान वाढवते, एकमेकातील तणाव रुसवे फुगवे दूर करण्यात मदत करते व मानसिक स्थिती मजबूत होते. फिरोजा रत्नामुळे मनाची अद्भुतशक्ती व आत्मविश्वास वाढण्यात मदत होते, मनुष्याच्या शारीरिक व आत्मिक चक्रावर नियंत्रण ठेवते. फिरोज रत्न लग्नाला उशीर होत असेल, प्रेमसंबंध मजबूत करण्यासाठी, जीवनातील सुख शांतीसाठी व करियरसाठी परिधान करणे उत्तम समजले जाते.

धनु राशीसाठी फिरोज रत्न अत्यंत उपयुक्त आहे. फिरोजा रत्नावर गुरु ग्रहाचा प्रभाव असतो, हे रत्न खिशाला परवडणारे आहे. अस्मानी निळ्या रंगाचे असते. हे रत्न धारण करतांना दहा रत्तीच्या पुढे वजनाचे असावे, तसेच हे पेंडंट म्हणून ही परिधान करता येते. हे रत्न कलाकार, व्यवसायी, आर्किटेक्ट्, इंजिनियर व चिकित्सा क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना फलदायी ठरू शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या