Friday, May 10, 2024
Homeभविष्यवेधरवी रेषेमुळे राहुल यांना मान, सन्मान व कीर्ती !

रवी रेषेमुळे राहुल यांना मान, सन्मान व कीर्ती !

प्रफुुुल्ल कुलकर्णी – ज्योतिषभास्कर,सामुद्रिक मार्तंड 8888747274

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जन्म 1 जून 1970 रोजी दिल्ली येथे झाला. राहुल यांचे वडील माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी व सोनिया गांधी यांचे ते चिरंजीव. प्रियंका वाड्रा या राहुल यांची धाकटी बहीण. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले आणि लंडनमधील मॉनिटर ग्रुप या मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्ममध्ये तीन वर्षे काम केले. ते या संस्थेत संचालकही होते.

- Advertisement -

राहुल गांधींनी मे 2004मध्ये निवडणूक लढविण्याची घोषणा करून राजकारणात प्रवेश केला. लोकसभेत कुटुंबाच्या पारंपरिक उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघाच्या निवडणुकीतून त्यांनी सक्रीय राजकारणात पाऊल टाकले.

भारतातील प्रख्यात राजकीय कुटुंबातील एका तरुण सदस्याच्या उपस्थितीने तरूण भारतीयांत काँग्रेस पक्ष लोकप्रिय होईल आणि पक्षाचे राजकीय भविष्य उज्ज्वल राहील, असा सर्वांचा कयास होता. राहुल गांधी यांनी अमेठीची जागा जिंकली परंतू पुढे सर्वच राजकीय स्थिती ढासळत गेली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी आणि केरळमधील वायनाड अशा दोन मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली. अमेठीची कधीही न हरलेली जागा त्यांनी 55,120 मतांच्या फरकाने गमावली, हे ठळक राजकीय अपयश मानले गेले.

गांधी परिवाराची पक्षावर आजवर पकड होती. मात्र आता पक्षातूनच विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. पांच राज्यातील निवडणुकीच्या निकालावर राहुल यांच्या नेतृत्वाचे भवितव्य आहे. मात्र परंपरेप्रमाणे गांधी परिवारच पक्षाचे नेतृत्व करेल, असे मानणार्‍यांची संख्या मोठी आहे.

भारतीय राजकारणावर अनेक वर्षे वर्चस्व गाजविणार्‍या घराण्यातील व्यक्तीच्या हातावरील रेषा व ग्रह पाहण्याची माझी उत्सुकता फार दिवसापासून होती. परंतू राहुल यांच्या हाताचा चांगला फोटो मिळत नव्हता.

अधिक प्रयत्नाने राहुल यांच्या हाताचा स्पष्ट रेषा असलेला उत्कृष्ट फोटो मिळाला. हाताचा फोटो पाहतांना राहुल यांच्या हातावरील रेषा ग्रह कसे असतील, याबद्दल उत्सुकता होती. मागच्या लेखात भाऊ कदम यांचा हात पहिला, ते सुरवातीला भावाच्या पान टपरीवर बसत असत. मी सामान्य कुटूंबातला, ‘भविष्यवेध’चे वाचकही बहूसंख्येने सामान्यच आहेत.

ता सर्वांच्या हातावरील ग्रह रेषा सामान्य प्रतीच्या असणार. परंतू असामान्य व्यक्तीपैकी राहुल गांधी हे काय नशीब घेऊन आलेत? त्यांच्या हातावर नक्की रेषा, ग्रह किती शुभ व अशुभ त्या सामान्य वाचकांपर्यत पोहोचविण्यासाठी मी आज राहुल गांधी यांच्या हातावरील शुभ रेषांचे भविष्य सांगणार आहे. तसेच त्यांच्या हातावरील अशुभ म्हणण्यापेक्षा राजकीय जीवनातील यश-अपयश पाहणार आहोत.

राजकीयदृष्ट्या प्रभावी घरात जन्माला येणं हे भाग्यच. पणजोबा पंडित नेहरू आजी इंदिराजी आणि वडील राजीव गांधी हे सर्व भारताचे पंतप्रधान होते. या घराण्याने सुमारे 50 वर्षा पेक्षा जास्त भारतासारख्या महाप्रचंड देशाची सूत्रे आपल्या हाती ठेवली.

लोकशाही मार्गाने राजकीय सत्ता गाजवली. काँग्रेस पक्ष हा फक्त गांधी घराण्याचा हा समजही यातूनच उगवला. या घराण्यात राहुल यांनी जन्म घेतला हे त्यांचे भाग्यच.

काँग्रेस पक्ष मजबूत कसा होईल? राज्या राज्यात सत्ता कशी काबीज होईल? संपूर्ण भारतात काँग्रेस पक्ष मजबूत करणे हा वारसा पुढे नेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनातील अडचणी त्यांना नाहीत. सामान्य माणसाला, नोकरी मिळेल काय? आपण आपल्या आई वडिलांना सांभाळू शकू का? शे

तकरी असेल तर पाऊस पाण्यापासून सर्वच चिंता, धंदा असेल तर त्याची चिंता, मुलांना मोठे करून सुशिक्षित कार्याची चिंता, घरात एखादी वस्तू घ्यायची असेल तर तिच्या किंमतीची चिंता. त्यामुळे सामान्य माणसाचा लढा व राहुल यांचा लढा पूर्णतः वेगळा आहे.

राहुल गांधी यांच्या उजव्या हातावरील भाग्य रेषा

भाग्य रेषेचा उगम शुक्र उंचवट्याखालील मणिबंधातून झाला आहे. ही भाग्यरेषा जन्मतःच अमाप संपत्ती देते. राहुल यांना ती त्यांच्या पणजोबा पंडित नेहरूंपासून आलेली. नुकसान झाले म्हणून जमीन-जुमला विकण्याची यांच्यावर नोबत त्यांच्याव येणे अशक्य. संपत्तीची वाढच होत राहणार. भाग्य रेषा मनगटावरून शुक्र ग्रहावर आली व ती आयुष्य रेषेला छेद देऊन शनी ग्रहावर गेलेली आहे. ही रेषा फोटोत बाणाने दाखविली आहे. शुक्र उंचवट्यावरून आयुष्य रेषेला छेदून एखादी भाग्य रेषा शनी ग्रहाकडे जात असेल तर दुसर्‍यांच्या संपत्तीचा लाभ होतो. यात वाड-वडिलांकडून संपत्तीत मिळणार वाटा असतो. अशा सर्व व्यक्तींच्या हातावरील भाग्य रेषा शुक्र ग्रहावरून उगम पावते. राहुल यांच्या तर शुक्र ग्रहाच्या खाली मणिबंधापासून भाग्य रेषेचा उगम आहे. सामान्य व्यक्तीच्या हातावर भाग्य रेषेचा एखादा फाटा आयुष्य रेषेच्या आतून होत असेल तर अश्या भाग्यवंतांना वारसाने संपत्ती मिळते.

रवी रेषा – भाग्य रेषेतूनच रवी रेषेचा उगम आहे. त्यामुळे जन्मतःच सन्मान व कीर्ती मिळाली आहे. जशी सैफ अली खान यांच्या तैमूरला मिळाली आहे. तैमूरच्या हातावरील रवी रेषा राहुल यांच्या हातावरील रेषेप्रमाणे नक्कीच असणार. कारण यांना चमकदार वारसा मिळतो. राहुल यांच्या हातावरील मुख्य रवी रेषासुद्धा शनी ग्रहाच्या जवळ व रवी ग्रहाच्या कडेला आहे. अश्या परिस्थितीत आर्थिक लाभाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर पावले उचलली जातात. राहुल यांची रवी रेषा बुध व रवीच्या पेर्‍यात गेलेली नसल्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उत्तूंग यश मिळणार नाही. शिवाय भाग्य रेषेचा एक फाटा शनी ग्रहाकडे गेल्याने यांची संपत्ती वाढविण्याकडे कल असेल.

आयुष्य रेषा – आयुष्य रेषा शुक्र ग्रहाला पूर्ण वेढा घातलेली व उत्तम असल्याने आरोग्याच्या तक्रारी राहूल यांना असणार नाहीत. आयुष्य रेषा सुदृढ असल्याने जोम, उत्साह आयुष्यभर उत्तम राहणार आहे. आयुष्य रेषेवर दोन उत्कर्ष रेषा आहेत. परंतू पहिल्या थोड्या मोठ्या असलेल्या उत्कर्ष रेषेच्या वर एक आडवी बारीक रेषा गेल्याने उत्कर्षात अडथळे येतात. हे वय 47 येते त्यानंतर 51 व्या वर्षी परत उत्कर्ष रेषा असून ती आधी पेक्षा थोडी छोटी आहे. त्यामुळे 47 वयात मिळालेल्या उत्कर्षापेक्षा 51 वर्षी मिळणारे यश हे कमी असणार आहे. 51 वर्षानंतर राहुल यांच्या हातावर उत्कर्ष रेषा नाही. त्यामुळे पुढे मोठा उत्कर्ष होण्याचा संभव कमी आहे.

मस्तक रेषा – राहुल यांच्या हातावरील मस्तक रेषा लांब असून चंद्र ग्रहावर उतरली आहे. मस्तक रेषा चंद्र ग्रहावर खाली उतरली कि व्यक्ती भावनाशील जास्त असतो. व्यवहारात कमी पडतो. मात्र यांचे आडाखे उत्तम असतात व हे मनाचे पण खूप दिलदार असतात.

हृदय रेषा – राहुल यांची हृदय रेषा सरळ गुरु ग्रहावर गेली आहे. त्यामुळे यांच्यात स्वार्थी भाव जास्त असतो. अतिशय व्यवहारी पण आपल्याला जे पटेल, समजेल तेच हे करतात. दुसर्‍यांचे ऐकत नाही. त्यावेळेस भावनेच्या आहारी जात नाही. योग्य व कठोर निर्णय घेऊ शकतात.

विवाह रेषा – राहुल यांनी विवाह केला नाही. राहुल यांच्या हातावर करंगळीच्या खाली दोन विवाह रेषा आहेत. त्यापैकी एक 32 व्या वर्षी व दुसरी 41 वर्षातली आहे. राहुल यांच्या हातावरील विवाह रेषा पूर्ण लांबीच्या व ठळक नाहीत. त्यामुळे यांना लग्न करण्याची घाई नसते आणि आकर्षणही नसते. विवाह इच्छा कमी असते. त्यामुळे त्यांनी विवाह केला नाही, असे म्हणता येईल.

ग्रह-बोटे व अंगठा- शनीचे बोट थोडे तिरके आहे. त्यामुळे शनी ग्रहात न्यूनता अली आहे. पोटाचा विकार आहे. राजकारणात विचारपूर्वक कुरघोडी करताना डाव फसतात, अडचणी येतात. बुधाचे बोट म्हणजे करंगळी बाकीच्या बोटांच्या मानाने छोटी आहे. रवी बोटाच्या पहिल्या पेर्‍याखाली आहे. त्यामुळे वक्तृत्व हे ओघवते राहत नाही. सभा-संमेलने भाषणाच्या जोरावर जिंकता येत नाहीत. हातावर आडव्या रेषा नाहीत. त्यामुळे नशिबात अडचणी नाहीत. हातावरील सर्व ग्रह चन्द्र सोडून उत्तम आहेत. अंगठा मोठा व त्यावरील दोन्ही पेरे मोठी व शुभदायी आहेत. त्यामुळे जे ठरवले ते काम राहुल करतातच, आळशीपणा नाही. बोटांची शेवटची टोके गोल आहेत. त्यामूळे सारासार विचार शक्ती व शांतपणे विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता आहे. राहुल गांधी आहेत तोपर्यन्त काँग्रेसची वाटचाल उत्तम असेल व प्रमुख विरोधी पक्ष प्रमुख म्हणून त्यांचे कार्य मोठे असेल. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसची ताकद वाढणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या