Tuesday, April 23, 2024
Homeभविष्यवेधबुध रेषेमुळे संधीचे सोने

बुध रेषेमुळे संधीचे सोने

प्रफुुुल्ल कुलकर्णी – ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड,8888747274

भारतीय चित्रपटांसह हॉलिवूड चित्रपट गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. जमशेदपूर येथे 18 जुलै 1982 रोजीचा जन्म. प्रियांका यांचे आई आणि वडील दोघेही आर्मीत वैद्यकीय अधिकारी होते. त्यांच्या सारख्या बदल्या होत असल्याने प्रियंकाने वेगवेगळ्या शहरांचा व मित्र परिवाराचा अनुभव वयाच्या 13 वर्षापर्यंत घेतला.

- Advertisement -

वयाच्या 13 व्या वर्षी प्रियंका शिक्षणासाठी आत्याकडे अमेरिकेत गेल्या. अमेरिकेत असताना प्रियंका यांनी वेगवेगळ्या नाटक थिएटरमधून विविध पात्रे रंगविली. त्यांना अमेरिकेत वर्णावरून हिणवले जायचे. परंतु प्रियांका ह्या कष्टाळू व हुशार असल्याने त्यांनी या गोष्टी कधीही मनावर घेतल्या नाहीत. तीन वर्ष अमेरिकेच्या शाळेत राहिल्यानंतर 10 वीसाठी प्रियांका यांनी भारतात बरेली येथील सैनिकी शाळेत प्रवेश घेतला.

शिक्षण चालू असताना प्रियांका यांनी विविध सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला व प्रावीण्य मिळविले. 2000 साली प्रियंका यांनी फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेत रनरअपचा किताब पटकावत मिस वर्ल्डसाठी जागा निश्चित केली.

2000मध्ये ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावून प्रियंका यांनी जगाला आपल्या सौंदर्याची ओळख करून दिली. याच यशाने त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले केले. प्रियकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर या संधीचेही सोने केले. भारतात अनेक चित्रपट गाजवल्यानंतर त्यांनी हॉलिवूडकडे मोर्चा वळवला.

अमेरिकन थ्रिलर मालिका ‘क्वांटिको’मुळे त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजल्या. एबीसी या टिव्ही नेटवर्कमुळे मिळालेल्या या संधीमुळे अमेरिकन वाहिनीवर झळकलेली पहिली दक्षिण आशियाई अभिनेत्री ठरली. डायनॅमिक स्क्रीन एंट्री म्हणून त्यांची अमेरिकन मनोरंजन क्षेत्रातील प्रवेशाची दखल घेण्यात आली.

न्यूयॉर्क टाईम्सने तर या मालिकेच्या यशाची प्रमुख भागीदार म्हणून प्रियंकाचे कौतुक केले. प्रियंकाला अमेरिकन टीव्ही क्षेत्रातील अभिनेत्रीसाठीचा पीपल्स चॉईस अवॉर्ड मिळाला. हा पुरस्कार मिळविणारी ती पहिली दक्षिण आशियाई अभिनेत्री ठरली. 2020 मध्ये प्रियंकाने निक जोन्ससोबत लग्नगाठ बांधली. प्रियंकाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले. जागतिक स्तरावरच्या सामाजिक संस्थेत योगदान देत आहे.

डाव्या हातावरील संचित

हस्तसामुद्रिकशास्त्रात हात हाताचा आकार व बोटे, बोटांचा शेवट- टोकदार, निमुळता, गोल अथवा चौकोनी आकाराचा असतो. महिलांमध्ये हाताचा आकार हा नाजूक व बोटे टोकदार आढळतात. पुरुषापेक्षा महिलांच्या हाताचा आकार हा 30 टक्क्याने कमी असतो. हात लहान, बोटे निमुळते अथवा टोकदार अंगठा लहान लवचिक असतो. हस्तसामुद्रिकशास्त्रात संपूर्ण दोनही हाताचे अवलोकन करून त्या व्यक्तीतील व्यक्तिमत्व जाणून घेता येते. हाताचा आकार हा शरीरयष्टीपेक्षा मोठा, मजबूत अंगठा, बोटे सरळ व टोकाला बोथट झालेली असता व्यक्ती ठाम, निश्चयी, मेहनती व विचारपूर्वक निर्णय घेण्याची त्यांची क्षमता असते. हस्तसामुद्रिकदृष्ट्या व्यक्तीला येणार्‍या संवेदना हाताच्या बोटांतून प्रवेश करतात व हातावरील रेषा त्या येणार्‍या संवेदनांचे मेंदूकडे नेण्यासाठी वाहक असतात. डोळे, कान, नाक हे अवयव एकाच वेळी काम करीत असतात. संवेदनांचे पृथ्थकरण सर्वप्रथम बोटांच्या टोकाला होते. बोटे टोकदार निमुळते असतील तर संवेदना विना पृथ्थकरण प्रवेश करतात. बोटे बोथट, गोलाकार असतील तर ग्रहण करण्यात येणार्‍या संवेदना त्यांचे पृथ्थकरण झाल्याशिवाय त्यांना मेंदूकडे जाण्यासाठी मज्जाव करतात. पृथ्थकरणाच्यानंतरच त्या संवेदनांचे मेंदूकडे वहन होते. येणार्‍या संवेदनांचे पृथकरण झाले की, विचारपूर्वक प्रतिक्रिया व निर्णय हा सेकंदापेक्षा खूप कमी वेळात घडून येतो. प्रियंका यांच्या डाव्या हाताची बोटे बोटांच्या टोकाला गुरुचे बोट गोलाकार व बाकीचे चौकोनी आकाराचे आहेत. सहसा महिलांचे हातावर टोकदार बोटे असतात. त्यामुळे त्या चटकन एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतात. अविश्वाससुद्धा त्वरित दाखवितात. यांचे निर्णय विचारपूर्वक नसतात. हातांचा व बोटांचा आकार ही परमेश्वरी देणगी आहे. हातावरील ग्रहस्थिती व रेषा ह्या प्रियंकाच्या डाव्या हातावरील अत्यंत शुभ आहेत. हृदय रेषा गुरु व शनी बोटांपर्यंत गेल्याने व्यवहारी आहे. मस्तक रेषेचा एक फाटा वरच्या मंगळ ग्रहावर गेल्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेतात. मस्तक रेषेचा एक फाटा थेट चन्द्र ग्रहावर उतरल्यामुळे मनस्वी कलाकाराची देणगी ठरते. एक भाग्य रेषा मस्तक रेषेवर व दुसरी थेट शनी ग्रहावर गेल्याने पालकांची आर्थिक विवंचना नाही. बालपण सुखात गेले. आयुष्य रेषेतून बुध ग्रहावर बुध रेषा गेल्याने आत्यंतिक हुशारी प्रदान झालेली आहे. संधीचे सोन कस करायचे हे वारसाहक्कामधेच बाळकडू मिळालेलं आहे.

उजव्या हातावरील भविष्य

प्रियंका यांच्या उजव्या हातावरील बोटांची टोके निमुळती आहेत. परंतु ते बोटांवरील नखे निमुळती केल्याने तसे भासत आहे. वस्तुतः प्रियंका यांची बोटे नखाच्या टोकाला बोथटच आहेत. त्यामुळे डाव्या हातावरील बोथट शेवट असलेल्या बाबत जे भविष्य वर्तविले आहे ते तंतोतंत उजव्या हातालासुद्धा लागू पडते. बोटे सरळ व टोकाला बोथट झालेली असता व्यक्ती ठाम, निश्चयी, मेहनती व विचारपूर्वक निर्णय घेण्याची त्यांची क्षमता असते. प्रियंकाच्या हातावरील ग्रहस्थिती सर्वोत्तम आहे. त्यांची उत्तम साथ आहे. हातावरील रेषा स्पष्ट दोषरहित भाग्यकारक व पूर्ण लांबीच्या आहेत. मस्तक रेषा डाव्या हाताप्रमाणेच आहे. त्यामुळे हुशारी व कलाक्षेत्रात कौशल्य आहे. उजव्या हातावरची मस्तक रेषा आयुष्य रेषे पासून दूरवर उगम पावत आहे. अश्यावेळी या व्यक्ति स्वतंत्र निर्णय घेण्यात सक्षम असतात. त्यामुळेच त्यांनी त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या अमेरिकन तरुणाशी प्रेमविवाह केला. आयुष्य रेषा व मस्तक रेषेत अंतर असता यांचेकडे अत्यंतिक हुशारी असते. यांना जीवनात पुढे मोठे होऊन कोणत्या क्षेत्रात काम करायचे ते अगदी हे लहानपणातच ठरवून टाकतात. त्याप्रमाणे जीवनात ते नियोजनबद्ध पावले टाकतात. हृदय रेषा सुद्धा गुरु व रवीच्या बोटांच्या पर्यंत गेल्याने यांना आपला स्वार्थ नेहमी कळतो. हे लोकांचा उपयोग पायरीप्रमाणे करू शकतात. उजव्या हातावरील बुध रेषा ही आयुष्य रेषेतून निघून सरळ बुध व रवीच्या पेर्‍यात गेल्याने यांना अांतरराष्ट्रीय ख्याती ही मिळणारच होती. भाग्य रेषेचा मस्तक रेषेतून उगम पाऊन ती शनी व रवीच्या बोटांच्या पेर्‍यात गेल्याने प्रसिद्धी उपरांत त्यांच्या मागे पैसा येणार हे निश्चितच होते व आहे. प्रियांकाचा डॉक्टर आईने तिच्यातील टॅलेन्ट ओळखला होता. सुमारे दोन वर्ष तिच्यावर मेहनत घेऊन अांतरराष्ट्रीय स्पर्धेत तिला उतरविले होते. प्रियांका नशीब घेऊन जन्माला आली असली तरी ती सौंदर्यवती नाही. मात्र आत्यंतिक हुशार, हजरजवाबी, स्मार्ट व अभिनय कौशल्याची साथ, मेहनत घेण्याची तयारी व यश मिळविण्याचा ध्यास यामुळेच प्रियंका आज आंतरराष्ट्रीय अभिनेत्री म्हणून नावारूपास आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या