Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेध‘वा गुरु’... नवज्योतसिंग सिद्धू !

‘वा गुरु’… नवज्योतसिंग सिद्धू !

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड-8888747274

नवज्योतसिंग सिद्धू यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1963 रोजी पटियाला येथे झाला. त्यांचे वडील सरदार भगवंतसिंग हे सुद्धा क्रिकेटपटू होते. सिद्धू यांनी मुंबई येथे एच.आर. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे शिक्षण घेतले.

- Advertisement -

त्यांनी नोव्हेंबर 1981 मध्ये अमृतसरमधील सर्व्हिसेसविरूद्ध पंजाबकडून खेळत क्रिकेटच्या प्रथम श्रेणीमध्ये प्रवेश केला. 1983 मध्ये त्यांना भारतीय कसोटी संघात संधी मिळाली. न्यूझीलंड विरुद्धच्या बेंगळुरू कसोटी सामन्यात पहिल्या शतकासह त्यांनी जोरदार सुरूवात केली.

कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनशी मतभेद झाल्याने त्यांना 1996 च्या इंग्लंड दौर्‍यातून माघार घ्यावी लागली. यानंतर वेस्ट इंडिज दौर्‍यात 1996-97 मध्ये त्यांनी संघात पुनरागमन केले. पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात त्यांंनी दुहेरी शतक झळकावले. 2001 भारतीय संघाने श्रीलंकेच्या दौरा केला. यावेळू सिद्धू वेगळ्या भुमिकेत समोर आले. टीव्हीवर क्रिकेटचे समालोचक म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. लवकरच सिद्धू समालोचक म्हणून प्रख्यात झाले.

सिद्धू 2004 मध्ये भारतीय जनता पक्षात सामील झाले आणि त्यावर्षी अमृतसर येथून सार्वत्रिक निवडणूक लढवली. त्यांनी भारतीय जनता पक्षात पदाचा राजीनामा देण्यापूर्वी आणि पक्ष सोडण्याआधी 2016 मध्ये त्यांंना पंजाबमधून राज्यसभेवर उमेदवारीची ऑफर देण्यात आली होती. 2017 मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. ते नियमितपणे विविध भारतीय वृत्तवाहिन्यांवर क्रिकेटतज्ज्ञ म्हणून हजेरी लावत असतात.

सिद्धू यांनी 2012 मध्ये पुन्हा ईएसपीएन स्टार स्पोर्ट्स वाहिनीसाठी काम करण्यास सुरवात केली. इंडियन प्रीमियर लीगच्या मौसमात त्यांनी वादग्रस्त विधाने केल्याने त्यांचा सोनी वाहिनीशी वाद झाला. त्यानंतर स्टार स्पोर्ट्स वाहिनीत काम करताना वाद झाले.

ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या दूरदर्शन कार्यक्रमात जज म्हणून सिद्धू यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. फनजाबी, चक दे सारख्या इतर कार्यक्रमांमधून ते टिव्हीवर दिसले. त्यांनी करीना करीना नावाच्या टीव्ही मालिकेत काम केले आहे. बिग बॉस 6 या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ते स्पर्धक होते. 2012 मध्ये राजकीय कारणास्तव शोमधून बाहेर पडावे लागले.

2013 पासून ते ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या कार्यक्रमात झळकत होते. 2016 पर्यंत त्यांनी वा गुरु ही दाद चांगलीच प्रसिद्ध झाली. पाकिस्तान संदर्भातील वादग्रस्त विधानांमुळे त्यांना कॉमेडी शो सोडावा लागला. सिद्धू यांनी 10 जून 2019 रोजी पंजाबच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. एकूणच क्रिकेटचे मैदान असो, मनोरंजन क्षेत्र असो किंवा राजकारण सर्वत्र संचार करताना त्यांनी स्पष्टवक्तेपणा जपला. मात्र त्यामुळे अनेक वादही उफाळले. त्याचे चटके त्यांनाही सहन करावे लागले.

नवज्योतसिंग सिद्धू हे एक क्रिकेटपटू व राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. यांचे इतर लोंकाशी वेगवेगळ्या कारणाने कायम मतभेद व खटके उडत गेले. त्यांच्या आयुष्यात मतभेदांमुळे त्यांनी क्रिकेटमधे व राजकारणात त्यांची जेव्हढी क्षमता व हुशारी आहे त्या क्षमतेचा विचार केला तर ते कायम त्यांच्या संशयी स्वभाव, मागचा पुढचा विचार न करता केलेली वक्तव्ये व असुरक्षित भावानेमुळे पिछाडीला पडत गेले. नाहीतर ते भारतीय क्रिकेटचे कप्तान व राजकारणात मुख्यमंत्री तरी नक्की झाले असते.

हस्तसामुद्रिकदृष्टया सिद्धू यांचे त्यांच्या जीवनात अनेक व्यक्ती व संस्थेबरोबर खटके उडण्याची करणे –

1. सिद्धू यांचे पहिले गुरुचे बोट टोकाला वक्र आहे, त्यामुळे दुसर्‍या व्यक्तीवर विश्वास कमी असतो.

2. गुरु उंचवटा अति फुगीर झाल्यामुळे अहं भाव खूप असतो, मी म्हणतो तेच खरे करण्याची प्रवृत्ती असते.

3. गुरु उंचवट्यावर गुरु वलय असल्याने असे लोक कोणाला फसवत नाहीत, दोन नंबरचे व्यवसाय करीत नाहीत.

4. मस्तक रेषा दोन आहेत, त्यापैकी मुख्य मस्तक रेषेला दुसर्‍या गोलाकार मस्तक रेषेने छेदले आहे. शिवाय ही दुसरी मस्तक रेषा शनी रवीच्या ग्रहाकडे म्हणजेच मधल्या दोन बोटाकडे खेचली गेलेली आहे. ही खेचली गेलेली किंवा बोटांखालील ग्रहाकडे आकर्षित झालेली मस्तक रेषा असुरक्षित भावना देते.

गोलाकार झालेली व बोटांकडे आकर्षित झालेली ही मस्तक रेषा वयाच्या 25 वर्षांपासून वयाच्या 60 वर्षापर्यंत तीव्र आहे. त्यामुळे वय वर्ष 25 ते 65 वयापर्यंत सिद्धू यांची मानसिक असुरक्षित भावना कायम राहणारी आहे.

या मस्तक दुसर्‍या गोलाकार मस्तक रेषेमुळे सिद्धू यांचे अनेकांशी खटके उडत गेले आहे. दुसरी मस्तक रेषा हृदय रेषेजवळ आहे. तिने मंगळाचे मैदान संकुचित केले आहे. त्यामुळे सारासार विचार शक्ती कमी होते व मनावर ताण आला की, चुकीचे निर्णय घेतले जातात.

खालच्या मंगळ ग्रहावर मस्तक रेषा व आयुष्य रेषेला छेदून गेलेल्या रेषा असल्यामुळे सिद्धू स्वभावतःच शिघ्रकोपी आहेत, राग चटकन येतो.

सिद्धू यांच्या हातावरील रविचे तिसरे व बुधाचे चौथे बोट लांबीला प्रमाणापेक्षा मोठे आहे. त्यामुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची इच्छा राहते. करंगळी लांब असल्याने वक्तृत्व व हुशारी प्रदान झाली आहे.

अंगठा मोठा व मजबूत असला तरी त्याच्या पहिल्या पेरावर व दुसर्‍या पेराच्या मध्यभागी आडव्या रेषा आहेत. या पहिल्या पेराच्या आडव्या रेषा विचार शक्तीत अडथळा व दुसर्‍या पेरावरील आडव्या रेषा निर्णयात घाई करतात साधक बाधक निर्णय हुशारी असून होत नाहीत.

हाताचा बांधा मजबूत आहे मस्तक रेषा सोडली तर हातावरील सर्व रेषा भाग्यकारक आहेत. त्यामुळे सिद्धू ह्यांनी प्रसिद्धी पैसा व खूप नाव कमाविले. सिद्धू हे अष्टपैलू आहेत.

एक खेळाडू म्हणून, क्रिकेटवरील समालोचक, राजकारणी व टीव्हीवरील मालिका मधून सिद्धू यांना सर्व गोष्टी भरभरून मिळाल्या. परंतु मस्तक रेषेच्या खाली असलेल्या आडव्या रेषेनी त्यांना कायम वेसण घातले. त्यांचा भाग्यात त्या आडव्या आल्या.

हातावरील रवी व गुरु ग्रह हे बलवान आहेत मात्र गुरु ग्रह अति फुगीर झाल्यामुळे व गुरु ग्रहाचे पहिले बोट टोकाला वाकडे असल्याने गुरु ग्रहात दोष निर्माण झाला आहे.

तसेच रवीचे बोट अवास्तव लांब आहे त्यामुळे बेफिकिरी व जुगारी प्रवृत्ती असते, कायम मिडियात चर्चेत राहण्यासाठी व प्रसिद्धीसाठी हे अथक प्रयत्न करीत राहतात.

रवी ग्रहाचा व गुरु ग्रहाचा दोष कमी होण्यासाठी सिद्धू यांनी गुरु ग्रहाचे पुष्कराजचे रत्न पहिल्या बोटात व रवीच्या बोटात माणिक रत्न परिधान केले आहे.

पुष्कराज व माणिक रत्न दोनही हाताच्या पहिल्या व तिसर्‍या बोटात परिधान केले आहे त्यामुळे गुरु व रवी ग्रहाचे दोष कमी होण्यास मदतच झली आहे, चारही बोटातल्या अंगठ्या फोटोत बाणाने दाखविल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या