Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधमायावतीजी - मूर्ती लहान कीर्ती महान

मायावतीजी – मूर्ती लहान कीर्ती महान

प्रफुुुल्ल कुलकर्णी – ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड 8888747274

मायावतींचा जन्म 1 जानेवारी 1956 रोजी नवी दिल्ली येथे दलित कुटुंबात झाला. वडील प्रभु दास, गौतम बुद्ध नगरमधील बादलपूर येथे पोस्ट ऑफिस कर्मचारी होते. मायावती यांनी बी.ए. 1975 मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कालिंदी महाविद्यालयात आणि नंतर दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केले. त्यांनी बी.एड्. पण केले. 1976 मध्ये त्यांनी दिल्लीत शिक्षिका म्हणून काम काम केले. 1977 मध्ये त्यांनी आय.ए.एस. परीक्षांसाठी अभ्यास करण्यात सुरूवात केली. अनुसूचित जमाती आणि इतर मागास जातींच्या राखीव कोट्यातून त्यांचे आय.ए.एस. होण्याचे स्वप्न होते.

- Advertisement -

श्री. कांशीराम हे याच दरम्यान मायावती यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी गेले होते. या भेटीत कांशीराम त्यांना सांगितले की, मी तुला एक दिवस इतका मोठा नेता बनवू शकतो की एक आय. पी. एस. नाही तर आय. पी. एस. अधिकार्‍यांची रांग तुझ्या आज्ञेसाठी उभी राहील. कांशीराम यांनी 1984 मध्ये बहुजन समाज पार्टीची स्थापना केली तेव्हा मायावती यांना आपल्या टीमचे सदस्य म्हणून समाविष्ट केले होते. 1989 मध्ये मायावती पहिल्यांदा संसदेवर निवडून गेल्या.

आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत मायावतींनी मागासवर्गीयांसाठी सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रातील आरक्षणाला पाठिंबा दर्शविला, त्यात धार्मिक अल्पसंख्यक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत उच्च जाती अशा अनेक समुदायांच्या कोट्यात वाढ आणि समावेशासाठी त्यांनी प्रयत्न केला.

ऑगस्ट 2012 मध्ये एक विधेयक मंजूर झाले ज्यात घटनेत दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केली गेली, जेणेकरून आरक्षणाची व्यवस्था राज्यातील अनेक पदोन्नतीपर्यंत वाढवता येईल. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिम्हा राव यांनी या घटनेला मायावतींच्या कारकीर्दीला लोकशाहीचा चमत्कार म्हटले होते. लाखो दलित समर्थक मायावती यांना एक आयकॉन म्हणून पाहतात आणि त्यांना बेहेनजी म्हणून संबोधतात.

त्यांच्या सार्वजनिक सभांना मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित असतात. कांशीराम का मिशन अधूरा, करेगी बेहेन मायावती पूरा, बेहेनजी तुम संघर्ष करो; हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणा देतात. मायावती पहिल्यांदा 1994 मध्ये उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेल्या. 1995 मध्ये त्या आपल्या पक्षाच्या प्रमुखपदी होत्या. अल्पकालीन युती सरकारमध्ये मुख्यमंत्री झाल्या. भारतातील इतिहासामधील पहिल्या सर्वात तरुण महिला दलित मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मान मिळविला.

1997 मध्ये आणि त्यानंतर 2002 या काळात भारतीय जनता पक्षाशी युती करून त्या उत्तर प्रदेशच्या पुन्हा मुख्यमंत्री राहिल्या. डिसेंबर 2001 ला लखनौमध्ये मोर्चाच्या वेळी झालेल्या भाषणात कांशीराम यांनी मायावती यांचे नाव उत्तराधिकारी म्हणून ठरवले. 18 सप्टेंबर 2003 रोजी त्यांची बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

मुख्यमंत्री म्हणून मायावतींनी कार्यक्षम कारभार आणि कायदा व सुव्यवस्थेला चालना मिळवून देण्यासाठी नावलौकिक मिळविला आणि विरोधी पक्ष व अन्य प्रतिस्पर्ध्यांनीही त्यांची प्रशंसा केली. मुख्यमंत्री असताना अनेक हाय-प्रोफाइल गुन्हेगार आणि माफिया डॉन यांना त्यांनी तुरूंगात डांबले. त्यांनी बलात्काराविरूद्ध कठोर कायदे करण्याची मागणी केली.

आधीच्या किंवा त्यानंतरच्या सरकारांच्या तुलनेत त्यांच्या कार्यकाळात दंगली, बलात्कार आणि भ्रष्टाचार यांचे प्रमाण नगण्य होते. मायावतींनी 13 मे 2007 रोजी चौथ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. समाजातील दुर्बल घटकांना सामाजिक न्याय पुरविणे आणि बेरोजगारांना पैशांचे वाटप करण्याऐवजी रोजगार उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करणारा अजेंडा त्यांनी जाहीर केला.

उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनविण्याचा त्यांचा नारा होता. मुलायमसिंग सरकारच्या काळात भरती झालेल्या पोलिस अधिकार्‍यांच्या भरती प्रक्रियेतील अनियमिततेबद्दल त्यांच्या सरकारने मोठी कारवाई सुरू केली. नोकरीसाठी झालेल्या अनियमिततेमुळे 18,000 पेक्षा जास्त पोलिसांना नोकर्‍या गमावल्या आणि 25 भारतीय पोलिस सेवा अधिकार्‍यांना हवालदार भरती करताना भ्रष्टाचारात सामील केल्याबद्दल निलंबित करण्यात आले.

निवड परीक्षेचा निकाल ऑनलाईन पोस्ट करण्यासह भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मायावतींनी सुधारणांची केली. 2007 च्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत बसपने बहुसंख्य विजय मिळवून विविध जाती व धर्मातील उमेदवार उभे केले. हाथी नाही, गणेश है, ब्रह्मा, विष्णू महेश हे हत्ती हे बीएसपी चिन्ह असल्यामुळे मायावतींनी सर्व समाज एकत्र येईल अश्या पद्धतीच्या घोषणा तयार केल्या होत्या. त्यांच्या पक्षाच्या वतीने निधी उभारणीच्या प्रयत्नांसाठी कौतुक केले.त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या आणि पक्षासाठी तथाकथित समर्थकांनी जमा केलेली मोठी रक्कम ही चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या वैयक्तिक संपत्तीत होणारी वाढ यावरुन त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. 1 मार्च 2012 रोजी मायावतींनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला त्या प्रतिज्ञापत्रात 111 कोटींची मालमत्ता त्यांनी जाहीर केली होती.

मायावती यांच्या हस्त लक्षणांचे विवेचन !

संपूर्ण सृष्टीत मानवाला परमेश्वराने जे दोन हात दिले आहेत व ते दोन हात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत अशा प्रकारचे हात प्राण्यांमध्ये फक्त चिंपाझीला आहेत परंतु त्या चिंपाझीच्या हातावरील अंगठ्याचे स्थान खूप वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला असल्याने त्यांच्या अंगठ्यातील ताकद मानवाच्या हातातील अंगठ्या पेक्षा खूप कमी आहे.

हस्तसामुद्रिकशास्त्रात अंगठ्याच्या आकाराला व लांबीला खूपच महत्व आहे. अंगठ्याच्या आकाराने त्या व्यक्तीच्या अंगी असलेले शहाणपण, जिद्द, विचारशक्ती, काम करण्याची प्रेरणा, आपल्या तत्वाला किंवा आपल्या मताशी ठाम राहण्याची शक्ती, हुकूमत गाजविण्याची ताकद, अथवा गुलामगिरी इत्यादी बाबी उघड होतात.

हाताचा आकार व त्याची निर्मिती स्वयं ब्रम्हाची असून त्यात या ब्रम्हनिर्मित हात हाताचा आकार, हातावरील मुख्य ग्रहांचे स्थान,स्पर्श व संवेदना ज्या आपल्या हातावर अतिशय तीव्र असतात त्या हातावरील मुख्य नाडीचा संबंध हा मेंदूशी निगडित असतो.

प्रत्येकाच्या हातचा आकार व बोटांचा आकार हा भिन्न असतो, जुळ्या मुलांच्या हाताच्या आकारात सुद्धा कधी साम्य आढळत नाही. बोटांवरील वरील विविध छाप हे जन्मापासून मृत्यू पर्यंत बदलत नाहीत, या छापावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व कळते, अंगची हुशारी कला गुण ओळखता येतात.

थोडक्यात मानवाचे हात हे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे भागीदार असतात, हाताच्या आकारावरून त्या व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तिमत्व कळते.

हस्तसामुद्रिकशास्त्रात हाताच्या व पायांच्या आकारांच्या लक्षण यांचा अंतर्भाव आहे. त्यातच हात हाताचा आकार,बोटे बोटांची लांबी रुंदी त्यांची टोके व बोटात असलेल्या सांध्यांच्या आकार, बोटातील वक्रता, बोटे एकमेकांकडे आकर्षिले गेलेले अथवा स्वतंत्र सरळ, एक सारख्या लांबीचे, निमुळते होत गेलेले, अति आखूड, अति लांब, प्रमाणात व बोटांच्या नखाच्या आकाराला, हातची त्वच्या, मऊ,मुलायम, खडबडीत, तळहाताचा रंग, तळहातावरील स्निग्धता, आर्द्रता, कारेडेपणा, रुक्ष त्वचा इत्यादी अनेक प्रकारचे परीक्षण व त्यांचे हस्तसामुद्रिकशास्त्रातील शास्त्रीय कसोट्यानुसार त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे पैलू ,स्वभाववैशिष्ट्ये फक्त हाताच्या आकारावरून जाणून घेता येतात.

पुरुषांच्या हाताचा आकार हा महिलांच्या हाताच्या आकार पेक्षा 30 ते 40 टक्के मोठा असतो त्यामुळेच पुरुष प्रधान संस्कृती आहे, पुरुषांसारखी निर्णय क्षमता महिलांमध्ये दिसून येत नाही कारण महिलांच्या हातामधील ताकद ही तुलनेने कमी असते. मायावती यांच्या लेखात आपण हातावरील रेषांचा अभ्यास न करता फक्त हाताच्या आकारावरून त्या व्यक्तीच्या

अंगी असलेले कर्तृत्व, विचारशक्ती, हुशारी, निर्णय क्षमता, वक्तृत्व, नेतृत्व इत्यादी पैलू फक्त हाताच्या आकारावरून व त्यांच्या अभ्यासावरून त्यांचे भाकीत करता येते. अर्थात भाग्यवान व्यक्तींच्या हातावरील भाग्य रेषेचा उगम आयुष्य रेषेतून होतो त्याप्रमाणे मायावती यांची भाग्य रेषासुद्धा आयुष्य रेषेतून उगम पावलेली आहे.

महिलेचा हाताचा आकार पुरुषांच्या आकरा सारखा असेल तर त्या पुरुषाला लाजवेल इतक्या धडाडीने व हुशारीने काम करतात. एखादया घरात महिलेचे राज्य चालत असेल तर त्या महिलेच्या हाताचा आकार बांधा हा निश्तिचतच पुरुषांच्या आकारासारखा मजबूत सापडेल. मायावती यांची शरीरयष्टी ठेंगणी होती, परंतु त्यांच्या हाताचा पंजा हा मोठा व मजबूत आहे, सहसा अश्या आकाराचा हात महिलांमध्ये दिसून येत नाही सरासरी सर्व महिलांचे हाताचे व बोटांचे आकार नाजूक सापडतात. मायावती यांच्या हाताच्या आकाराचे प्रमाणात बोटांची लांबी कमी आहेत म्हणजे बोटे आखूड आहेत, आखूड बोटे असलेल्या व्यक्ती मागचा पुढचा विचार ना करता जलद निर्णय घेतात, निर्णयाच्या परिणामांची फिकीर त्या करीत नाहीत.

मायावती यांच्या मजबूत हाताच्या बांध्याचे गुपित – मायावती यांच्या हाताचा आकार हा पुरुषाच्या मजबूत हाताच्या आकाराप्रमाणे असल्याने त्याच्यात पुरुषांप्रमाणेच निर्णय क्षमता,नेतृत्व,हुशारी यांचा संगम झालेला दिसून येतो आहे. हात व हाताचा व बोटांचा आकार हा हस्तसामुद्रिकशास्त्रातील एक महत्वपूर्ण बाब आहे, हाताच्या आकारानंतरच हातावरील रेषांचा प्रभावाबद्दल अचूक कारण मीमांसा किंवा भाकीत करता येते. या लेखात मायावती यांच्या मजबूत हाताच्या आकाराचे भविष्य आपण जाणून घेतले. मायावती यांच्या कर्तृत्वात पुरुषासारखा मोठा हाताचा पंजा हे परमेश्वरी वरदानच आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या