Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधओळख रत्नांची

ओळख रत्नांची

मानवाने अनंतकाळात रत्न वा स्फटिकांमध्ये सौंदर्य, शक्ती व त्यात लपलेल्या रहस्यांचे दर्शन घेतले आहे.

ज्या प्रकारे वनस्पतीमध्ये मानवाचे आरोग्य स्वस्थ ठेवण्याची शक्ती आहे त्याच प्रकारे रत्नांमध्ये व स्फटिकांमध्येही ह्या प्रकारची शक्ती व बहुगुण आहेत.

- Advertisement -

स्फटिक हे विशिष्ट उर्जाने बनले जातात आणि त्याचाच उपयोग आपण आपले जीवन सुंदर बनविण्यासाठी करू शकतो.पाहूया यातील काही रत्नांची ओळख……

1) फिरोजा

प्रकार – तांबे व लोहाची छटा असलेला

रंग – हिरवट निळा (आकाशी), फिरोजी

औषधी उपचार – डोळे, कान, मेंदू, गळा, मान, फुप्फुसे, अर्धशिशी, डोकेदुखी, अलर्जी, वायरल इन्फेक्शन इ. विकारांवर गुणकारी.

भावनिक उपचार – मन शांत करण्यासाठी, मनस्ताप सौम्य करण्यासाठी, विमानाची किंवा हवेत तरंगण्याची भीती घालविण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. तुमच्या मनातील अपराधीपणाची भावना दूर करण्यासाठी किंवा एखाद्या निर्णयाने दुखावले गेलेल्या मनाला उबारी देण्याचे काम फिरोजा करते.

व्यवहारीक उपयोग – फिरोजाचा उपयोग शेतकरी किंवा पाळीव प्राणी पाळणारे, प्राण्यांचे सैरभैर होणे किंवा चोरीला जाणे ह्या साठी करू शकता. समाजात नेतृत्व करणार्यांनी हा स्टोन घालावा.फिरोजा ह नशीब उघडणारा, यश, पैसा, कीर्ती, ध्येय व कलात्मकता ह्यासाठी तीलीस्माती (अविस्मरणीय) सिद्ध झाला आहे. हा न्यायी (कधी ही अन्याय सहन करू न देणारा व अन्याय करू न देणारा) खडा मानला गेला आहे.

येणार्‍या संकटांपासून आपल्याला दुर करतो, मुस्लीम लोकांत मोठ्या प्रमाणात वापरला जातो. हा स्टोन दोन कलरमध्ये असतो (ब्ल्यू आणि ग्रीन), ब्ल्यू स्टोन ला जास्त महत्त्व आहे. हा स्टोन खूप नाजूक असतो त्यामुळे या खड्यामागे लाख लावलेली असते, लाखेसहीत अंगठी किंवा लॉकेट करावे.

2) पायराइट (धनाकर्षक)

प्रकार – आयर्न सल्फेट

रंग – चंदेरी (मेटॅलिक व सिल्वरी)

शारीरिक उपयोग – सर्दी पडसे, प्ल्यू यांसारखे वायरल आजार, रक्ताशी निगडीत आजार, मुख्यत तांबड्या पेशी व रक्त अल्पता तसेच फुप्फुसांच्या आजारांसाठी प्रभावी. वायरल आजारांपासून सुरक्षा होते.

भावनिक उपचार – सहकारी किंवा पार्टनर ह्यांच्याकडून होणारी टीका, दबाव, वरचढपणा, ह्यामुळे येणारी निराशा तसेच घरच्यांच्या अपेक्षेमुळे मनावरील प्रेशर या सर्वांना सामोरी जाण्यासाठी आंतरीक शक्ती जागृत करतो.

कामाच्या ठिकाणी – पायराइट व्यक्तीतील नायक गुणांना (लिडरशीप) प्रभावित करतो.

व्यावहारिक उपयोग – घरी किंवा कामात पायराइट वापरणारे कधीही आर्थिक निर्णय चुकीचे घेणार नाहीत.

पायराइट मध्ये गुप्त अग्नी व प्रत्येक व्यक्ती मधील स्वबळावर धन उर्जित करणारी शक्ती आहे. आयर्न पायराइटला मूर्खांचे सोने असे ही नाव देण्यात आले आहे. पण हे सत्य नाकारता येत नाही की मौल्यवान वस्तूंच्या शोधात खरे सोने व पायराइट ह्यामध्ये गफलत होते, कारण खरे सोने पायराइटला समांतर आढळून येते, म्हणून जीवनातील चांगल्या वाईटाची ओळख न पटणारे मूर्खच म्हणावे. तुम्ही घरापासून दूर असताना तुमच्या जवळील पायराइट तुमचे संरक्षक कवच बनते. आरोग्य चांगले राहून दीर्घायुष्य लाभण्यासाठी, पैसे मिळण्यासाठी किंवा पैसा खेचून घेण्यासाठी याचा उपयोग केला जातो. धनसंपदा खेचून घेण्याची आकर्षण क्षमता ह्यामध्ये आहे.

सारांश – सोन्याच्या कलर सारखा दिसतो. प्रमोशन अडकलेले असतात, इन्क्रिमेंट होत नसेल तर हा स्टोन घालावा. वायरल आजारांपासून संरक्षण देतो, पैशाचे मार्ग मोकळा करतो,

3) ग्रीन प्लोराइट

प्रकार – हलाइड, कॅल्शियम प्लोराइट

रंग – हिरवा

शारीरिक उपचार – हा खडा रोग प्रतिकारक शक्ती वाढवून संसर्गजन्य आजारांना अटकाव करतो. पेशींची पुन:निर्मिती करून उर्जा व कार्यशक्ती वाढवून शरीरात खनिज शोषण करण्यास मदत करतो. मुख्यता दात, हाडं, रक्तवाहिन्या, फुप्फुसांसाठी उपयुक्त.

भावनिक उपचार – ग्रीन प्लोराइट एखाद्याच्या मनात दाबल्या गेलेल्या इच्छा, आकांक्षा, मते किंवा विचार किंवा मनात कोंडून ठेवलेले दु:ख मोकळे करण्याची हिंमत देते. लहानपणीच्या किंवा अनेक वर्षापुर्वींच्या भावनांना नवीन उभारी देण्यास मदत करतो.

कामच्या ठिकाणी – घरात, ऑफिस मध्ये किंवा इतर ठिकाणी विद्युत उपकरणांमुळे निर्माण होणार्‍या नकारात्मक उर्जेला अवरोध करतो.

व्यवहारीक उपयोग – मुलांमधील भांडणे, खोड्या, दंगामस्तीचे प्रमाण कमी करण्यासाठी मुलांच्या खेळण्याच्या जागी ठेवा. अत्यंत प्रदूषित परिसरात काही प्रमाणात शुद्ध नैसर्गिक श्वास घेण्यासाठी ग्रीन प्लोराइट कामी येऊ शकतो. धुर, धुळ किंवा गलिच्छ रस्त्यावरून प्रवास करणार्‍या शाळकरी मुलांनी हे जरूर जवळ बाळगावे.

4) रेड जस्पर

प्रकार – सिलिकेट, मायक्रो क्रिस्टलाइन क्वॉर्टज, त्यात असलेल्या मोठ्या प्रमाणातील लोहामुळे त्याला तांबडा रंग आलेला आहे.

रंग – लाल ते टेराकोटा तांबूस चॉकलेटी, काहीवेळा इतर धातूंच्या मिश्रणामुळे काळसर रेघा दिसतात.

शारीरिक उपचार – रक्ताशी निगडीत समस्या, जसे रक्ताभिसरण, रक्ताल्पता, रक्तपेशी, दुषित रक्त, इ. साठी उपयुक्त. स्त्रियांसाठी सुरक्षित बाळंतपण किंवा त्यावेळेतील त्रास कमी करण्यासाठी. तसेच गर्भावस्थेतील अगदी सुरुवातीची ट्रीटमेंट सुरु असताना ह्याचा सकारात्मक प्रभाव पडतो. हृद्याविषयी समस्या किंवा बायपास, ट्रान्सप्लांट यासारख्या शस्त्रक्रिया ह्यासाठी हि जस्परचा फायदा होऊ शकतो. भाजणे, खरचटणे, सांधेदुखी यावर सुद्धा रेड जस्पर उपयोगी आहे.

भावनिक उपचार – दबाव, धमकी, घरगुती हिंसाचार ह्याविरुद्ध उभे ठाकण्याची मानसिक शक्ती रेड जस्पर एखाद्या गंभीर आजारात मानसिक स्थिरता ठेवण्याचे काम जस्पर करू शकतो.

व्यवहारीक उपयोग – हिवाळ्यात किंवा थंड प्रदेशात रेड जस्पर दागिन्यात किंवा जवळ बाळगल्यास तुम्हाला त्याचा उष्ण प्रभाव जाणवेल.

कामाच्या ठिकाणी – एक शक्तीशाली खडा जो तुमचा आत्मविश्वास व इतरांमध्ये तुमच्या विषयी आदराची भावना वाढीस लावील. ह्या भावहीन व स्पर्धात्मक जगात स्वत:चा ठसा उमटवण्यासाठी प्रत्येक धडपडणार्‍या माणसासाठी रेड जस्पर हे प्रभावशाली खडा आहे. मुलांना एकटीने वाढवणार्‍या मातांसाठी रेड जस्पर हे शक्तिवर्धक आहे. अभिनव क्षेत्रातील लोकांना ह्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. मनातील भीतीपासुन संरक्षण मिळण्यासाठी रेड जस्पर जवळ ठेवा. तुमच्या वाहनाची सुरक्षा जसे चोरी, अपघात, रोसरेज या पासून बचाव करण्यासाठी वाहनात ठेवा.

5) लॅपिस लॅझुली

प्रकार – अनेक धातू पासून तयार होणारा खडक ज्यात लॅझुराईट, सोडालाईट, कॅल्साइट व पायराइट इ. समाविष्ट असतात.

रंग- शाही निळा (रॉयल ब्ल्यु), परपल ब्ल्यु, सोनेरी छटा असलेला ग्रीन ब्ल्यु.

शारीरिक उपचार – मुख्यत: इंडोक्राईन ग्रंथी व मज्जासंस्थेवर उपचार, डोकेदुखी, अर्धशिशी, बोनमॅरो, नाक, कान अवयवातील दाहकता यावर प्रभावी.

भावनिक उपचार- स्वत:ची जबाबदारी ओळखणे, एखादी संधी हुकल्यास दुसर्‍याला दोष न देत बसता स्वत:तील कमतरता शोधणे.

व्यवहारी उपयोग- तुम्हाला एखाद्या कार्याची किंवा स्वत:ची प्रसिद्धी हवी असल्यास त्या कार्याच्यावेळी लॅपिस जरूर जवळ ठेवा.

कामाच्या ठिकाणी- लॅपिसला करीअर स्टोन असे ही म्हणतात. कारण प्रमोशन ह्याकडे आकर्षित होतात.

लॅपिस लॅझुली हे आभूषणात वापरले जाणारे प्रथम जेमस्टोन आहे. लॅपिस हा सत्याचा खडा आहे. लिहिताना, बोलताना हा सत्याला प्रोत्साहीत करतो. खोल मनातील संवाद साधताना लॅपिस वापरावा. प्रेमात लॅपिस मुळे हृद्य हृदयाशी संवाद साधण्यात यशस्वी ठरतो. लॅपिस मैत्रीसाठी ही आदर्श मानला गेला आहे, कारण लॅपिस नात्यांमध्ये संतुलन ठेवुन नाती टिकवण्यास मदत करतो.

6) टायगर आय

प्रकार – ऑक्साईड क्वार्टस

रंग – मातकट, चॉकलेटी, सोनेरी पट्ट्या

शारीरिक उपचार – पोटातील विकार, अल्सर, सांधेदुखी इ. वर प्रभावी/ शारीरिक उर्जा व ताकद वाढवून शरीर संतुलित ठेवण्यास मदत करतो.

भावनिक उपचार – चुकीच्या आहार पद्धतीस अटकाव करतो. सिगारेट, दारू, ड्रग्ज यासारख्या हानिकारक सवयींवर ताबा मिळवण्यासाठी इच्छा शक्ती व भावनिक स्थिरता प्रदान करतो. आरोग्य सुधार उपचारांना यश येण्यासाठी टायगर आयचा वापर उपयुक्त ठरेल.

घशाचे विकार, जननसंस्थेशी संबंधीत विकारांमध्ये तसेच मोडलेली हाडे सांधण्यासाठी उपयोगी आहे.

व्यवहारीक उपयोग – पैशाची स्थिर आवक घरात सतत आकर्षित करण्यासाठी टायगर आयचा उपाय करून बघा. एखाद्या चांगल्या दिवशी झाकण असलेल्या भांड्यात टायगर आय ठेवा व त्यात रोज एक नाणं टाकत रहा. भांड नाण्यांनी भरलं की ते पैसे दान धर्मात किंवा स्वत:च्या हौसेसाठी खर्च करा व परत सुरुवात करा, नक्की प्रचीती येईल.

कामाच्या ठिकाणी – व्यापार्‍यांसाठी किंवा नवीन व्यापार उद्योग सुरु करणार्यांसाठी तसेच ज्ञान व कुशलता ह्यावर आधारीत व्यापार यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. आत्मविश्वास वाढवतो. रोमन सैनिक स्वत:मधील शूरता वाढवण्यासाठी टायगर आय बरोबर नेत असत.

टायगर आयची घडण अशाप्रकारे झाली आहे की समोरच्या माणसाची नकारात्मक उर्जेला आपल्यामध्ये शोषण्यास अटकाव करतानाच त्याच्या बद्दलची भीती परावर्तीत करतो व आपल्याला मानसिक बल प्रदान करतो.

एखाद्या माणसाची विश्वासहर्ता तपासण्यासाठी टायगर आय हातात धरा व तुमच्या मनाचा कौल घ्या. तुमच्या मनावर विश्वास ठेवा. तुम्ही कोणत्याही स्पर्धेत भाग घ्यायला घाबरत असाल किंवा तुमच्या कडून हवी तशी कामगिरी होत नसेल तर तुम्ही टायगर आय वापरून बघा तुमची भीती पळून जाईल. तुमची एखादी वस्तू मार्केटमध्ये विकली जात नसेल तर तुम्ही टायगर आयची मदत घ्या, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.

- Advertisment -

ताज्या बातम्या