Tuesday, April 23, 2024
Homeभविष्यवेधभाग्य रेषेतून बहरले ऐश्वर्याचे सौंदर्य, प्रसिद्धी, ऐश्वर्य

भाग्य रेषेतून बहरले ऐश्वर्याचे सौंदर्य, प्रसिद्धी, ऐश्वर्य

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड – 8888747274

ऐश्वर्या रॉय-बच्चन यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 झाला, त्या एक सफल अभिनेत्री आणि 1994 च्या मिस वर्ल्ड विजेत्या आहेत.

- Advertisement -

यशस्वी अभिनय कारकीर्दीतून त्यांनी स्वत: ला भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी सेलिब्रिटी म्हणून प्रस्थापित केले आहे.

रॉय यांना दोन फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार मिळाली आहेत. त्यांना 2009 मध्ये भारत सरकारने पद्मश्री आणि 2012 मध्ये फ्रान्स सरकारने ‘ऑर्ड्रे देस आर्ट्स एट डेस लेट्रेस‘ या उपाधीने सन्मानित केले होते.

ऐश्वर्या यांना विविध माध्यमांमधून व बहुसंख्य जागतिक मिडियातून जगातली सर्वात सुंदर स्त्री म्हणून गौरविले आहे.

कॉलेजमध्ये असताना त्यांनी मॉडेलिंगची कामे केली आहेत. अनेक दूरचित्रवाणी जाहिरातींमध्ये हजेरी लावता लावता त्यांनी मिस इंडिया स्पर्धेत प्रवेश केला. पुढे मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर त्यांना चित्रपटात अभिनय करण्याच्या ऑफर येऊ लागल्या.

त्यांनी मणिरत्नमच्या 1997 च्या ‘इरुवार’ या तामिळ चित्रपटतून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आणि त्याच वर्षी और प्यार हो गया हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला.

हम दिल दे चुके सनम (1999) आणि देवदास (2002) मधील अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअरमध्ये दोन सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाले.

मोहब्बते (2000) धूम 2 (2006), गुरू (2007) , जोधा अकबर (2008), एन्थिरन (2010) आणि ऐ दिल है मुश्किल (2016) असे अनेक चित्रपट सुपर डुपर यशस्वी चित्रपट त्यांनी केले.

2007 मध्ये त्यांनी अभिनेता अभिषेक बच्चन यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला एक मुलगी आहे. अनेक सामाजिक व धर्मादाय संस्था आणि त्यांच्या मोहिमेसाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांनी काम केले.

2004 च्या उत्तरार्धात, त्यांनी ज्येन ऑस्टिनच्या ‘प्राइड अँड प्रेज्युडिस’ या कादंबरीवर आधारित चित्रपटातील मार्टीन हेंडरसनच्या भूमिकेसाठी समीक्षकांची त्यांनी वाहवा मिळविली.

गुरुविंदर चड्ढा यांच्या ब्रिटिश चित्रपटामधून आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभिनेत्री म्हणून त्यांना मान्यता मिळली. हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सुमारास सलमान व एश्वर्या यांच्या मैत्रीच्या बातम्या चर्चित होत्या. सलमान खानसोबत ब्रेक-अप होण्यापूर्वी अभिनेता विवेक ओबेरॉयसोबत त्यांच्या प्रेमसंबंधाची चर्चा फिल्मी मिडियात होती. त्या बॉलिवूडच्या सर्वाधिक यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहेत.

व्यवहारवादी आणि कष्टाळू

आयुष्य रेषा व मस्तक रेषा उगम पावताना वयाच्या सात वर्षापर्यंतच एकत्र आहेत, अश्या स्थितीत व्यक्ती खूप लहान असतानाच स्वतंत्र विचाराच्या असतात. त्यांना जीवनात त्यांना कुठला मार्ग स्वीकार करायचा याचा निर्णय त्या स्वतः घेतात. मस्तक रेषासुद्धा सरळ वरच्या मंगळ ग्रहाकडे सरळ गेली आहे. तीचे गुण – व्यवहारवादी व कष्टाळूपणाचे आहेत.

मस्तक रेषेचा एक फाटा चंद्र ग्रहावर उतरला आहे त्याने कलाविष्काराची जोड मिळाली आहे. आयुष्य रेषा सुदृढ व निरोगी आहे. निरोगी असल्यामुळे उत्साह व शारीरिक कष्ट घेण्याची क्षमता मोठी आहे. त्याच्याच साथीला मंगळ रेषा आहे. तिची साथ तारुण्यात बहाल झाली आहे. मंगळ रेषा वयाच्या 40 वर्षापर्यंत आहे. त्यामुळे शारीरिक जोम, जोश यांची कमतरता नाही.

हृदय रेषा सरळ आहे व ती थेट गुरु ग्रहावर गेली आहे. त्यामुळे स्वार्थी भाव आहे. स्वतःचाच विचार करणे व फायद्याचे जे असेल तेच करणे, समोरच्याला भावनिक ब्लॅकमेल करणे, मात्र स्वतः दुसर्‍यांच्या भावनांची कदर न करणे, अश्या गुणधर्माची हृदय रेषा असता असे लोक वेळ आली की निष्टुर होतात. याचे उदाहरण म्हणजे सलमान खान यांचेबरोबरचे प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतर अभिषेकशी केलेल्या विवाहाचे देता येईल.

हृदय रेषेतून गुरु उंचवट्यावर एक फाटा गेल्याने सात्विकता लाभली आहे व उतुंग यश प्राप्ती दाखविते. हातावरील सर्वात भाग्यकारक चिन्ह हे रवि ग्रहावर आहे. रवि ग्रहावर त्रिशूल चिन्ह झाले आहे. या त्रिशूल चिन्हाने जागतिक प्रसिद्धी व श्रीमंती लाभली आहे.

अंगठ्याच्या सांध्यावरील यवाच्या आकाराचे चिन्ह आहे. (गव्हाच्या दाण्याच्या आकाराचे) या चिन्हामुळे आयुष्यात आर्थिक कमतरता असत नाही.

हातावर शनीच्या मधोमध भाग्य रेषा गेलेली आहे व ती बारीक असल्याने आर्थिक संपन्नता दाखविते. भाग्य रेषेचा उगमही आयुष्य रेषेतून झाला आहे. अशी भाग्य रेषा असता ह्या व्यक्ती जन्मतःच भाग्य घेऊन आलेल्या असतात. यांना यश सहज लाभते व यशामागे आर्थिक परिस्थिती वेगाने सुधारते.

विवाह रेषा बारीक व लांब आहे अशी रेषा पुरुषाच्या हातावर असो अथवा स्त्रीच्या, त्यांची आपल्या जोडीदाराला मुठीत ठेवण्याची मानसिकता असते, त्यांच्या जोडीदाराच्या सर्व हालचालीवर करडी नजर असते. त्यांच्या तालानुसार वागावे लागते. आपल्या जोडीदाराने कसे राहावे कसा पेहराव करावा कोणाशी संबंध ठेवावे अथवा बोलावे अथवा नाही अश्या बारीक सारीक गोष्टीत नियंत्रण जोडीदारावर ठेवण्याचा यांचा प्रयत्न असतो.

परमेश्वर कृपेशिवाय असे सौन्दर्य व यश हे करोडोत एखाद्याला लाभते व त्या सोन्दर्याच्या जोडीला अंगची हुशारी लाभलेली असावी लागते. ती हातावरील चन्द्र ग्रह मनगटाकडे खाली वाढला आहे, त्यामुळे लाभली आहे. कलाविष्काराचे गुण मस्तक रेषा चंद्रावर उतरली आहे. त्यामुळे अभिनय व नृत्य यात निपुणता मिळाली आहे.

शुक्र व चंद्र ग्रह शुभकारक व स्वच्छ आहेत. हातावर आडव्या रेषा नाहीत, अशुभ चिन्हे नाहीत. अंगठा मोठा व मजबूत असल्याने निर्णय क्षमता आहे. त्यामुळे स्वतःच्या तत्वाला हे कायम चिटकून असतात व कोण्याच्या अधिपत्याखाली रहाणे यांना सहन होत नाही व ते राहूही शकत नाहीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या