Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधखर्चावर नियंत्रण ठेवा

खर्चावर नियंत्रण ठेवा

सौ. वंदना अनिल दिवाणे

ऑगस्ट – 2020

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शनी, द्वितीयात नेपच्यून, तृतीयात मंगळ, चतुर्थात हर्षल, षष्ठात शुक्र , सप्तमात बुध , अष्टमात रवि, व्ययात केतू-गुरू-प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे भो, जा,जी, खी,खू, खे,खो,गा,गी अशी आहेत. राशीचे चिन्ह – मगर आहे. राशी स्वामी- शनी, तत्व -पृथ्वी असल्याने सहनशक्ती चांगली आहे. चर रास असल्याने सतत काही तरी बदल हवा असतो. दक्षिण दिशा फायद्याची. राशीचे लिंग स्त्री असल्याने स्वभाव सौम्य, तमोगुणी, वात प्रकृती, स्थूलपणा टाळण्यासाठी दररोल हलका व्यायाम करा. राशीचा अंमल गुडघ्यावर आहे. शुभ रत्न नीलम, शुभ रंग – निळा, आकाशी, काळा. शुभ दिवस- शनिवार, देवता- शनि, शुभ अंक- 8, शुभ तारखा- 8, 17, 26,मित्र राशी- कुंभ, शत्रु राशी- सिंह, उत्तम प्रशासक, सतत कामात मग्न, कर्तव्यदक्ष.

षष्ठात शुक्र आहे. नोकरीपासून सुख मिळेल. आहार विहारात फार जपून रहाल. विषयसुखाचा अतिरेक केल्यास स्वास्थ बिघडेल. व्ययात प्लुटोने खर्चाचे प्रमाण काहीसे वाढविले तरी अध्यात्मात उत्तम प्रगती होऊन मानसिक शांती मिळेल.

स्त्रियांसाठी – स्त्रियांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणाच्या धमक्यांना न भिता तोंड देण्याची तयारी ठेवावी. तरच स्त्रियांना शत्रुवर विजय मिळवता येईल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात प्रगती होईल. आळस झटका अन्यथा नुकसान होईल. गेलेला वेळ परत येणार नाही.

शुभ तारखा – 2, 3, 4, 5, 7, 8, 11, 13, 15, 20, 21, 22, 23, 25, 28, 30, 31.

सप्टेंबर- 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शनी, द्वितीयात नेपच्यून, चतुर्थात मंगळ, हर्शल, षष्ठात राहू, सप्तमात शुक्र, अष्टमात रवि, नवशमात बुध व्ययात केतू-गुरू-प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.

अष्टमात रवि आहे. त्यामुळे नवविवाहीतांना लाभ होईल. किंबहुना अशा लोकांना विवाहानंतर भाग्योदय सुरू झाल्याची प्रचीती येईल. नववधुवरील असलेल्या प्रेमामुळे म्हणा किंवा अन्य काही कारणामुळे घरातील मंडळींशी पटणार नाही. लहान सहान गोष्टींवरून कलह निर्माण होईल.

व्ययात गुरू आहे. वितंडवादावर नियंत्रण ठेवा. ईश्वरी सत्तेबद्दल म्हणावा तसा विश्वास वाटणार नाही. विनाकारण भटकण्याची सवय बंद करा. अनाठायी पैसा खर्च करू नका. कोणाशी मैत्री करावी व कोणाशी करू नये याचा विवेक बाळगा. धार्मिक संस्थेचे अधिपत्य करू शकाल. अध्यात्मात प्रगती होईल. एकांतस्थळापासून लाभ होतील. लोकांशी संबंध असलेल्या खात्यात नोकरी मिळेल. कर्जापासून दूर रहा. कर्ज घ्यावेच लागले तर हप्ते वेळेवर भरा.

नवमात बुध आहे. आर्थिक आवक चांगली राहील. ती ही सरळ मार्गाने व सत्संग व सत्पुरूषाच्या सेवेपासून लाभ होतील. लेखक वर्गाच्या हातून प्रतिभासंपन्न लिखाण होईल. परदेशगमनाची संधी मिळेल.

स्त्रियांसाठी – सप्तमात शुक्र आहे. नातेवाईक व शेजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्ठीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परीक्षेसाठी चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे दुर्लक्ष करा. भविष्याच्या दृष्ठीने फायद्याचे असेल.

शुभ तारखा – 2, 3, 4, 6, 7, 10, 13, 14, 18, 24, 25, 26, 28, 29, 30.

ऑक्टोबर – 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शनी, द्वितीयात नेपच्यून, तृतीयात मंगळ, चतुर्थात हर्शल, पंचमात राहू, अष्टमात शुक्र,नवमात रवि, लाभात केतू, व्ययात गुरू-प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात मंगळ आहे. प्रसिद्धीच्या झोतात याल. पराक्रमाला जोर येईल. सज्जनतेकडे कल राहील. लढाऊवृत्ती चांगली राहील्यामुळे शत्रुंचा पराभव होईल. त्यात दैवी कृपेचा भाग असेल. भावंडांसाठी खर्च करावा लागेल. कवी वर्गाला चांगल्या कविता सुचतील. दैवी कृपेची प्रचिती येईल.

लग्नी शनी आहे. तीक्ष्ण बुद्धीमुळे अभ्यासू वृत्ती राहील. उद्योगशीलतेत वृद्धी होईल. हिशेबीपणामुळे धनसंग्रह करणे तर जमेलच शिवाय नियमीत बचत करणे सोपे जाईल. प्रामाणिकपणामुळे नोकरीत उन्नती होईल. भावनिकपणामुळे जनमानसात चांगली छबी निर्माण होईल. स्वमत हट्टाचा जास्त आग्रह करू नये.

धनस्थानी असलेला नेपच्यून धनप्राप्तीसाठी नवनवीन कल्पनांचे भांडार तुमच्यापुढे उघडे करील. अन्य जनांचे लक्षही जाणार नाही. अशा कल्पना सुचतील. त्या कृतीत आणल्याने उद्योगधंदे, ललीतकला, कथालेखन, वक्तृत्त्व यांपासून द्रव्यलाभ होईल. खर्चाच्या बाबतीत नियंत्रण आवश्यक आहे.

पंचमात राहू आहे. संततीपासून सौख्य मिळेल. स्त्रीवर्गाला स्वास्थ हानी होऊन काही विकारांना तोंड द्यावे लागेल.

स्त्रियांसाठी – अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी – विदयार्थ्यांनी स्वास्थ्याची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 2, 4, 3, 10, 11, 13, 17, 19, 21, 22, 24, 25, 26, 28, 29, 31.

- Advertisment -

ताज्या बातम्या