Saturday, April 27, 2024
Homeजळगावक्रायसीसचा परिणामामुळे संस्कृतीची पडझड

क्रायसीसचा परिणामामुळे संस्कृतीची पडझड

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

भाऊंना भावांजली तिसर्‍या दिवशी क्रायसीस व सांस्कृतिक जग ही चर्चा आज रोटरी भवन येथे आयोजित करण्यात आली होती.

- Advertisement -

प्रा.डॉ.एस.एस.राणे, अ‍ॅड.सुशील अत्रे , प्रा.अनिल डोंगरे , डॉ.अस्मिता गुरव, मंजुषा भिडे यांनी चर्चेत भाग घेतला. अनिल कांकरिया व सुदीपता सरकार हे कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी होते.

अस्मिता गुरव यांनी क्रायसीस हा माणसाच्या सर्वच क्षेत्रांवर परिणाम करतो. आताच्या कोविडच्या जागतिक महामारीने आपल्याला सर्व स्तरावर पछडले आहे.

तर मंजुषा भिडे यांनी सांस्कृतिक जग ही व्यापक संकल्पना आहे, केवळ कथा, कविता, नाट्य, संगीत, नृत्य इतकी याची मर्यादा नाहीतर एकूणच जगण्याचा पूर्ण पट म्हणजे सांस्कृतिक जग होय.

या सांस्कृतिक विश्वाची वाहक आहे ती म्हणजे स्त्री, आपल्या संस्कृतीचा डोलारा हा स्त्रियांच्या त्यागावर उभा आहे. सांस्कृतिक जग ही वेगळी गोष्ट नाहीतर ती आपल्या जगण्याचा भाग आहे.

तुकोबा म्हणतात, तस तुज आहे तुज पाशी ..असच सांस्कृतिक जगाच आहे. यामुळे क्रायसीसचा परिणाम सांस्कृतिक जगावर होणारच आहे. उदा. काश्मीरमधील परिस्थितीमुळे पर्यटन संस्कृतीवर झाला.

यामुळे तिथल्या आर्थिक जगावर परिणाम झाला. याचाच अर्थ क्रायसीस आपल्या जगण्यावर सर्वांगीण परिणाम होतो, अशी मांडणी अ‍ॅड. सुशील अत्रे यांनी केली.

क्रायसीस ही सापेक्ष बाब असून, एका संस्कृतीवर दुसर्‍या संस्कृतीच आक्रमण म्हणजे क्रायसीस होय. वैयक्तिक व सामूहिक अश्या स्तरावर क्रायसीस विविध परिणाम घडवतो.

सामाजिक लवचिकता व कौटुंबिक स्वातंत्र्य यावर होणारा परिणाम याचा एकत्रितपणे परिणाम हा सांस्कृतिक जगावर होतो. अश्या वेळी सांस्कृतिक घटकांनी अधिक सक्षमपणे काम करायला हवं जे परिवर्तन जळगाव करत आहे.

याच कामाने आपण क्रायसीसचा मुकाबला करू शकतो. तर एस.एस.राणे यांनी क्रायसीस निर्माण होतो तेव्हा त्या मधून मानवी कल्याणाचा मार्ग अधिक प्रशस्त होतो. बुद्ध, महावीर, ज्ञानेश्वर, तुकाराम यांनी आलेल्या क्रायसीसला समोर जात.

मानवी जगाला उन्नतीचा मार्ग दाखवला आहे. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. या चर्चासत्राला अमर कुकरेजा, अनिष शहा, नारायण बाविस्कर, सुनीला भोलाने, पियुष रावल, राम पाटील, नंदलाल गादिया, शरद पांडे आदी मान्यवर उपस्थित होते .

- Advertisment -

ताज्या बातम्या