भावलीत 50 टक्के पाणीसाठा दारणा आज निम्मे होणार

jalgaon-digital
2 Min Read

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर काल सोमवारी मध्यमस्वरुपाचा पाऊस झाला. काल सायंकाळी दारणा 49 टक्क्यांवर पोहचले. आज मंगळवारी सकाळी दारणा निम्मे भरलेलेे असेल. भावली काल सकाळी 51 टक्के भरले होते.

काल दिवसभर दारणा, भावली या धरणांच्या पाणलोटात अधून-मधून मध्यम स्वरुपाच्या पावसाचे आगमन होत आहे. घाटमाथ्यावर पावसाच्या आगमनात सातत्य आहे. त्यामुळे दारणा, भावली इगतपुरी तालुक्यातील प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासांत दारणात 400 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात 3385 दलघफू पाण्याचा साठा तयार झाला आहे. दारणात आता पर्यंत 2524 दलघफू पाणी या हंगामात नव्याने दाखल झाले. हे पाणी अडीच टिएमसी इतके आहे.

काल सकाळी दारणाच्या भिंतीजवळ 19 मिमी, पाणलोटातील इगतपुरी येथे 61 मिमी, भावलीला 82 मिमी पाऊस झाला. भावली 50.98 टक्के भरले आहे. 1434 क्षमतेच्या भावलीत 731 दलघफू पाणीसाठा आहे. मुकणे 48.56 टक्के भरले आहे. काल सकाळी मागील 24 तासांत मुकणेत 66 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. वाकीला 39 मिमी, भामला 59 मिमी पाऊस झाला. वाकी 3.77 टक्के तर भाम 20.09 टक्के भरले.

गंगापूर 32.82 टक्के भरले. गंगापूरला 17 मिमी पावसाची नोंद झाली. पाणलोटातील त्र्यंबकला 16 मिमी, अंबोलीला 26 मिमी पावसाची नोंद झाली. 5630 क्षमतेच्या गंगापूरमध्ये 1848 दलघफू पाणीसाठा आहे. मोठ्या पावसाची सर्वच धरणांच्या पाणलोटाला गरज आहे. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतली आहे.

मुळा पाणलोटात पाऊस ओसरला

कोतूळ |वार्ताहर| Kotul

नगर जिल्ह्याला जिवनदायिनी ठरलेल्या मुळा धरणातही नवीन पाण्याची आवक काल मंदावली. काल सकाळपर्यंत या धरणात 176 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. 26000 दलघफू क्षमतेच्या धरणात काल सायंकाळी 9690 दलघफू पाणीसाठा झाला होता. तर 2829 क्युसेकने आवक सुरू आहे. पाणलोटात पावसाळी वातावरण टिकून असलेतरी केवळ घाटमाथ्यावरच अधूनमधून पाऊस कोसळत आहे. कोतूळ परिसरात पावसाचा जोर नव्हता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *