Saturday, April 27, 2024
Homeनगरवाकचौरे व छल्लारे उद्या हाती ‘शिवबंधन’ बांधणार

वाकचौरे व छल्लारे उद्या हाती ‘शिवबंधन’ बांधणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे व श्रीरामपूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष संजय छल्लारे उद्या बुधवार दि. 23 ऑगस्ट रोजी आपल्या कार्यकर्त्यांसह उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे स्वतः या दोघांच्या हाती ‘शिवबंधन’ बांधणार असून दोघांना दोन वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुंबई येथे ‘मातोश्री’ या उध्दव ठाकरे यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश होणार आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना गेल्या आठवड्यातच मातोश्री हून 23 तारखेचा निरोप देण्यात आला होता. तर दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूरचे माजी उपनगराध्यक्ष व युवक काँग्रेसचे शहर प्रमुख संजय छल्लारे यांना मातोश्री वरून पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दूरध्वनीवरून पक्ष प्रवेशासाठी 23 तारखेची दुपारी 12 वाजताची वेळ कळविली आहे. या प्रवेशासाठी दोघांचे समर्थक मोठ्या संख्येने मुंबईत मातोश्रीवर हजेरी लावणार आहेत.

या दोन्ही नेत्यांचा जाहीर प्रवेशाची श्रीरामपूर शिवसेनेतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्रीरामपुरातून शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी महिला आघाडी, युवा सेना तसेच सर्व निष्ठावान शिवसैनिक मातोश्रीवर जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे सचिन बडदे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या