Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याBhaubij 2022 : ‘या’ आहेत राजकारण गाजवणाऱ्या भावा-बहिणींच्या जोड्या

Bhaubij 2022 : ‘या’ आहेत राजकारण गाजवणाऱ्या भावा-बहिणींच्या जोड्या

दिवाळीच्या दिवसातील शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. यंदा भाऊबीज सण केला जाणार आहे. भाऊबीज दिवशी बहीण भावाचं औक्षणं करते. कला, क्रीडा, संस्कृती यांसह राजकीय क्षेत्रात असे काही भाऊ बहिणी आहेत, ज्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे.

राहुल गांधी-प्रियंका गांधी :

- Advertisement -

देशाच्या राजकारणात गांधी कुटुंबाचे नाव नेहमीच चर्चेत असते. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी हे सध्याच्या राष्ट्रीय राजकारणातील चर्चेत असलेले भाऊ बहिण म्हणून ओळखले जातात. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे दोघेही राष्ट्रीय राजकारणात चांगले सक्रीय आहेत.

अजित पवार आणि सुप्रिया सुळे :

राजकीय क्षेत्रातील भाऊ-बहिणी यांचे नाव घेतले तर सर्वात आधी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाते समोर येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे चुलत भाऊ-बहीण आहेत. मात्र या दोघांच्या नात्यात सख्ख्या भावंडांइतकाच गोडवा आहे. सध्या सुप्रिया सुळे देशाच्या तर अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत.

धनंजय मुंडे-पंकजा मुंडे :

महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेत असलेली भावंडांची जोडी म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी राजकारणाचे धडे गिरवले. मात्र त्यानंतर या दोघांचेही मार्ग वेगवेगळे झाले. परळी आणि बीड जिल्ह्यातील राजकारणात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत पाहायला मिळते. राज्याच्या राजकारणात हे दोघेही चांगलेच सक्रीय आहेत.

बाळासाहेब थोरात-दुर्गा तांबे :

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांची बहीण दुर्गा तांबे ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणातील भावा-बहिणींची जोडी एक महत्त्वाची जोडी मानली जाते. बाळासाहेब थोरात हे महसूलमंत्री आहे. तर दुसरीकडे त्यांच्या भगिनी दुर्गा तांबे या संगमनेर शहराच्या नगराध्यक्ष आहेत.

स्टॅलिन-कनिमोळी :

दक्षिणेकडील तामिळानाडूच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या एम. करुणानिधी यांची अपत्ये असलेल्या स्टॅलिन आणि कनिमोळी यांनी डीएमके पक्षाच्या माध्यमातून तामिळनाडूमधील जनमानसात आपली छाप सोडली आहे. स्टॅलिन हे सध्या डीएमकेचे प्रमुख आहेत. तर कनिमोळी या यूपीए सरकारच्या काळात केंद्रात मंत्रिपदावर होत्या.

तेजस्वी यादव – मीसा भारती :

बिहारच्या राजकारणातील प्रमुख व्यक्तिमत्त्व असलेल्या लालूप्रसाद यादव यांची अपत्ये असलेल्या तेजस्वी यादव आणि मीसा भारती यांचा सध्या राष्ट्रीय जनता दल पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये समावेश होतो. तेजस्वी यादव यांनी बिहारचे उपमुख्यमंत्रिपद भूषवले होते. तर मीसा भारती या लोकसभेच्या माजी खासदार राहिलेल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या