Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ विधिज्ञ व साहित्यिक अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांचे निधन

ज्येष्ठ विधिज्ञ व साहित्यिक अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांचे निधन

पुणे | प्रतिनिधी | Pune

ज्येष्ठ विधिज्ञ व साहित्यिक अ‍ॅड. भास्करराव आव्हाड bhaskarrao avhad यांचे आज पुण्यात दुख:द निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दीनानाथ मंगेशकर dinanath mangeshakar रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची coronavirus लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने विधी क्षेत्रात मोठे पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचा सदस्य असलेला एक मुलगा ॲड अविनाश आव्हाड, दोन मुली, पत्नी व दोन मुली, बंधू ॲड डॉ. सुधाकर आव्हाड आणि पुतणे असा परिवार आहे.

- Advertisement -

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. भारतात , राज्यात आणि पुणे शहरातही बिकट परिस्थिती झाली आहे. कोरोनामुळे विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

भास्करराव आव्हाड यांना काही दिवसांपू्र्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना दिनानाथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोनावर उपचार सुरू असताना त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवले होते. परंतु, त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांनी दिनानाथ हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

अ‍ॅड. भास्करराव आव्हाड हे मुळचे नगर ahmednagar जिल्ह्यातील शिराळ चिंचोडी या गावचे होते. भास्करराव आव्हाड हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे vilasrao deshmukh स्नेही होते. पुण्यातील एमआयटी शिक्षण संस्था उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते.

राज्यातील शेकडो न्यायाधीश तयार करण्यात तसंच वकिलांना मार्गदर्शन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. विविध वृत्तपत्रात त्यांचे कायदेविषयक आणि इतर विषयांवरचे वैशिष्ठ्यपुर्ण लेख प्रकाशित होत होते. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांचे अनेक खटले महत्वपूर्ण ठरले होते. वयाच्या ७७ व्या वर्षीही भास्कर आव्हाड हे राज्यातील विविध भागात प्रवास करून वकिलांना मार्गदर्शन करीत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या