Friday, April 26, 2024
Homeनगरसरपंचानी स्वार्थासाठी नव्हे, गावासाठी काम करावे

सरपंचानी स्वार्थासाठी नव्हे, गावासाठी काम करावे

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

आता निवडणुका संपल्या, राजकारण संपले, समाजकारण सुरू करा, कुणी मदत केली तर घ्या पण मदतीवर अवलंबून राहू नका.

- Advertisement -

सर्वांना बरोबर घेऊन गावचा विकास साधावा. संतांना जसे कर्मामध्ये देव दिसतात तसेच सरपंचाला ग्रामपंचायतीमध्ये देव दिसला पाहिजे. तुम्हाला काय येते हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही किती जणाला सोबत घेऊन चालता, त्यावर तुमच्या गावाच्या विकासाची दिशा व प्रगती अवलंबून असते, असे प्रतिपादन आदर्श गावचे माजी सरपंच भास्कर पेरे यांनी केले.

आप्पासाहेब राजळे सभागृहात आ. मोनिकाताई राजळे यांच्यावतीने पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार व आदर्श गाव पाटोदाचे माजी सरपंच भास्कर पेरे यांचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी आ. राजळे होत्या.

यावेळी भाजपचे पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शेवगाव तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे, शहराध्यक्ष अजय भंडारी, महिला तालुकाध्यक्ष काशीबाई गोल्हार, जि.प.सदस्य राहुल राजळे, संध्याताई आठरे, सभापती गोकुळ दौंड, उपसभापती मनिषा वायकर, पंचायत समिती सदस्य सोमनाथ खेडकर, सुनील ओव्हळ, सुभाष केकाण, वृध्देश्वरचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, भाजप किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष कचरू चोथे, दिनेश लव्हाट, सचिन नेहुल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

अध्यक्षस्थानावरून बोलताना आ. राजळे म्हणाल्या, इमारती बांधल्याने किंवा गटारी केल्या म्हणजे गावचा विकास होत नाही.गावात काम करताना मतभेद व मनभेद सांभाळले पाहिजेत. गावचा प्रमुख कृती करतो तेव्हा दुसर्‍याला सांगता येते. फक्त गाव आदर्श व्हावे ही आपली संकल्पना नसून पाथर्डी व शेवगाव तालुक्यासह मतदारसंघ आदर्श झाला पाहिजे ही संकल्पना आहे. कार्यकमासाठी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील हजारोंच्या संख्येने नवनिर्वाचीत ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. प्रस्ताविक रवींद्र वायकर यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या