Friday, April 26, 2024
Homeनाशिकदेवळा नगराध्यक्षपदी भारती आहेर

देवळा नगराध्यक्षपदी भारती आहेर

देवळा । प्रतिनिधी | Deola

येथील नगरपंचायतीच्या (nagar panchayat) नगराध्यक्षपदी (city president) भारती अशोक आहेर (Bharti Ashok Aher) तर उपनगराध्यक्षपदी जितेंद्र रमण आहेर (Deputy City President Jitendra Raman Aher ) यांची बिनविरोध निवड झाली.

- Advertisement -

नगरपंचाययत सभागृहात निवडणूक (election) निर्णय अधिकारी सी.एस. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवडून आलेल्या सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली. या सभेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची बिनविरोध निवड जाहीर केली गेली.

नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या (bjp) भारती आहेर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. त्यांना सूचक म्हणून संजय आहेर तर अनुमोदन म्हणून अशोक आहेर यांनी स्वाक्षरी केली. उपनगराध्यक्षपदासाठीही जितेंद्र आहेर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून भाग्यश्री पवार तर अनुमोदन म्हणून करण आहेर यांनी स्वाक्षरी केली.

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची बिनविरोध निवड घोषित होताच समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. याप्रसंगी गटनेते संजय आहेर, अशोक संतोष आहेर, करण आहेर, मनोज आहेर, कैलास पवार, भूषण गांगुर्डे, सुलभा आहेर, सुनंदा आहेर, भाग्यश्री पवार, शीला आहेर, रत्ना मेतकर, अश्विनी चौधरी, राखी भिलोरे, विरोधी गटनेते संतोष शिंदे, ऐश्वर्या आहेर उपस्थित होते.

नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे आमदार डॉ. राहुल आहेर (MLA Dr. Rahul Aher), केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State Dr. Bharti Pawar), जिल्हाध्यक्ष केदा आहेर (District President Keda Aher), तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, शहराध्यक्ष अतुल पवार,

भाऊसाहेब पगार, प्रवीण मेधने, पवन अहिरराव, डॉ. प्रशांत निकम, डॉ. ललित मेतकर, किशोर आहेर, अनिल आहेर, रोशन अली, बाबाजी निकम, प्रतीक आहेर, हर्षद भामरे आदींनी अभिनंदन केले. नवनिर्वाचित नगराध्यक्षा आहेर या बाजार समितीचे माजी सभापती अशोक आहेर यांच्या सुविद्य पत्नी आहेत.

देवळा (deola) नगरपंचायतमध्ये 17 पैकी 15 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले असून त्यात आठ महिला नगरसेविकांचा समावेश आहे. देवळा नगरपंचायतीचे अध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाल्याने नगराध्यक्ष होण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी सोमवारी नगरसेवकांची बैठक घेत नगराध्यक्षपदासाठी सन्माननीय तोडगा काढून माजी जि.प. सदस्या भारती आहेर यांना प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या