Monday, April 29, 2024
Homeनगरश्रीसाई मंदिराला भाजयुमोचे साकडं फेरी आंदोलन

श्रीसाई मंदिराला भाजयुमोचे साकडं फेरी आंदोलन

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

जगप्रसिद्ध साई मंदिर (Shirdi Sai Baba Temple) खुले व्हावे म्हणून ठाकरे सरकारला (Thackeray government) जाग आणण्यासाठी काल गुरुवार दि. 12 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने (Bharatiya Janata Yuva Morcha) प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे (State Vice President Sachin Tambe) यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत ‘श्रीसाई मंदिराला (Shri Sai Baba Temple) वाजत गाजत प्रदक्षिणा घालत साकडं फेरी’ आंदोलन (Movement) करण्यात आले. यादरम्यान शिर्डी पोलिसांनी (Shirdi Police) आंदोलन करणार्‍यांना ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करत काही वेळानंतर सोडून देण्यात आले.

- Advertisement -

भारतीय जनता युवा मोर्चाचे (Bharatiya Janata Yuva Morcha) प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन द्वारकामाई (Dwarkamai) समोर करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, बाळासाहेब गाडेकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, नगरसेवक मंगेश त्रिभुवन, बार काउन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल शेजवळ, सुनील लोंढे, आकाश त्रिपाठी, बबलू वर्पे, आकाश वाडेकर, मोहन क्षत्रिय, सुनील गांगुर्डे, अमित कुटे, सचिन आरणे आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कैलासबापू कोते, मंगेश त्रिभुवन यांनी साईमंदीर तातडीने खुले करण्यात यावे, अशी मागणी केली. उपस्थित मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर द्वारकामाईपासून (Dwarkamai) साकडं फेरीला सुरुवात करण्यात आली. साईमंदीर प्रवेशद्वार क्रमांक चार समोरून नगरकडून मनमाडच्या दिशेने जुना पिंपळवाडी रोडने पुन्हा ग्रामदैवत मारुती मंदिराकडून द्वारकामाई अशी साईमंदिराला प्रदक्षिणा मारली. यावेळी ठाकरे सरकारच्या (Thackeray government) विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. मंदिराला फेरा, सरकारला घेरा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यामध्ये शहरातील छोटे-मोठे हॉटेल, रेस्टॉरंट, हार प्रसाद विक्रेते, ट्रॅव्हल्सवाले, फूल उत्पादक शेतकरी यांच्यासह हातावर उपजिविका असणार्‍या नागरिकांनी सहभाग नोंदवला.

इतर राज्यातील धार्मिक तिर्थस्थळे देवस्थान उघडी असतांना महाराष्ट्रातील देवस्थाने बंद का? साईमंदिर बंद का असा सवाल यावेळी सचिन तांबे यांनी उपस्थित केला.

भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे यांच्यासह कार्यकर्त्यांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले असता तेथे कलम 68 प्रमाणे कारवाई करून सोडून दिले, अशी माहिती पोलीस निरीक्षक विकास देवरे (PI Vikas Devare) यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या