Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकभरत नाट्यममधून शरीराचा सर्वांगीण विकास होतो

भरत नाट्यममधून शरीराचा सर्वांगीण विकास होतो

सिन्नर । वार्ताहर Sinnar

भरत नाट्यम् (Bharat Natyam) या शास्त्रीय नृत्य प्रकारातून (Classical dance form) शरीराचा सर्वांगीण विकास (Holistic development of the body) होतो. भरतनाट्यम् करताना आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली करतो त्यातून अनेक प्रकारची योगासने (Yoga) आपोआप केली जातात. अंगी चपळता येते, शरीरात ऊर्जा निर्माण होते असे प्रतिपादन कनकलता प्रतिष्ठानचे उदय साकुरीकर यांनी केले.

- Advertisement -

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या (Nashik Shikshan Prasarak Mandal) मातोश्री चं.व अ.चांडक कन्या विद्यालयात आयोजित भरत नाट्यम् या शास्त्रीय नृत्याचे, कनकलता प्रतिष्ठानचे (Kankalta Pratishthan), कनकलता नृत्यालय, नाशिक (nashik) या संस्थेच्या वतीने सिन्नर तालुक्यातील (sinnar taluka) विद्यार्थिनींसाठी (students) सुरू केलेल्या भरत नाट्यम् या शास्त्रीय नृत्याच्या प्रशिक्षणाविषयी विद्यार्थिनींशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी मंचावर नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष एम.जी. कुलकर्णी, शालेय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम क्षत्रिय, बापूसाहेब पंडित, राहुल मुळे. मुख्याध्यापिका रेखा हिरे, वाय. एल.पाटील उपस्थित होते. देव- देवतांना प्रसन्न करण्यासाठी भरतनाट्यम् हे शास्त्रीय नृत्य केले जाते. तसेच तीन तासांच्या नृत्याच्या सरावातून पाच कि.मी. धावण्याचा आपल्या शरीरास व्यायाम मिळतो, डोळ्यांच्या शास्त्रशुद्ध हालचालींतून दृष्टी सुधारते, डोळ्यांचे आजार होत नाहीत, आपली वृत्ती सात्विक होते, चित्त एकाग्र झाल्याने आपला अभ्यासही चांगला होतो.

नृत्याच्या सरावातून तुम्ही मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त होतात, देहबोली सुधारते आणि सकारात्मक होते. या नृत्यात तुम्ही प्राविण्य मिळवा, आम्ही तुम्हाला व्यासपीठ मिळवून देऊ. त्यातून तुम्ही चांगल्या मार्गाने अर्थार्जनही करू शकता असे म्हणत साकूरीकर यांनी विद्यार्थीनींना भरत नाट्यम्चे फायदे समजावून सांगितले. प्रत्येक रविवारी दोन तास चालणार्‍या या प्रशिक्षणाचा लाभ सिन्नर तालुक्यातील कुठल्याही विद्यार्थीनी घेऊ शकतात. ईच्छूक विद्यार्थीनींनी कनकलता नृत्यालय आणि चांडक कन्या विद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन बापूसाहेब पंडित, नीलिमा दुसाने यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या