धगधगती मशाल हाती घेवून ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात दाखल; असा असेल राहुल गांधी यांचा आजच्या यात्रेचा कार्यक्रम

jalgaon-digital
1 Min Read

नांदेड | Nanded

कन्याकूमारी (Kanyakumari) पासून सुरु झालेले कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आता महाराष्ट्रात (Maharashtra) येवून ठेपली आहे. कालचं राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) या यात्रेने नांदेड (Nanded) जिल्ह्यात प्रवेश केला आहे. भारत जोडो यात्रेच्या पहिल्याचं दिवशी हातात मशाल पकडून राहुल गांधींनी देगलूर (Deglur) येथे दाखल झाली आहे.

महाराष्ट्र कॉंग्रेसकडून (Maharashtra Congress) राहुल गांधीसह (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेचे (Bharat Jodo Yatra) मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. राज्यातील बड्या कॉंग्रेस नेत्यांपासून ते छोट्या कार्यकर्त्यां पर्यत सगळेचं हजेरी लावणार आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) भारत जोडो यात्रेची जबाबदार अशोकराव चव्हानांकडे (Ashokrao Chavan) देण्यात आली आहे. तरी महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), पृश्वीराज चौहान (Prithviraj Chavan), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासारखे महत्वाचे नेते या यात्रेत विशेष उपस्थिती लावणार आहे.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही यात्रा नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांमधून जाणार आहे. यावेळी अनेक कार्यक्रम, सभा आणि चौकसभांचे आयोजन करण्यात आलं आहे.

आज असा असेल राहुल गांधी यांचा कार्यक्रम

यात्रा रात्री महाराष्ट्रात देगलूर येथे दाखल

सकाळी 8.30 वाजता: नांदेडमधील गुरुद्वारापासून यात्रेला सुरुवात होणार

सकाळी 9.30 वाजता: अटकाळी गावाजवळ विश्रांती

दुपारी 4 वाजता: पदयात्रेला खतगाव फाट्यापासून सुरुवात होणार

संध्याकाळी 7 वाजता: संध्याकाळची विश्रांती

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *