Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यादेशातील बेरोजगारी, हिंसाचार, महागाई विरोधात न्याय यात्रा- खा.राहुल गांधी

देशातील बेरोजगारी, हिंसाचार, महागाई विरोधात न्याय यात्रा- खा.राहुल गांधी

‘भारत जोडो न्याय यात्रा आम्हाला का करावी लागली?, बेरोजगारी, हिंसा, द्वेष यासारखे मुद्दे देशात मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे आम्हाला ही यात्रा करावी लागली. कोणताच पर्याय नव्हता. देशाच्या लक्षात आणून देणयासाठी आम्हा सर्वांना 4 हजार किलोमीटर चालावे लागले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता व लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडण्यासाठी शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, जम्मू काश्मीरमधील नेत्या महेबुबा मुफ्ती, वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आदी नेते उपस्थित होते.

- Advertisement -

खा.राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, लोकांना वाटते आम्ही राजकीय पक्षाविरोधात लढत आहोत. हे खरे नाही. आम्ही राजकीय पक्षातून लढत नाहीत. हे भारतातील युवकांना समजून घेण्याची गरज आहे. आम्ही सर्वजण नरेंद्र मोदी यांच्याविरोधात किंवा भाजपविरोधात लढत नाहीत. आपण एका शक्तीविरोधात लढत आहोत. राजाची आत्मा ईव्हीएममध्ये आहे. ईडी आणि सीबीआयमध्ये यांचा आत्मा आहे. माझ्या आईकडे एका नेत्याने रडत सांगितले की, या शक्तीविरोधात लढण्याची हिंमत नाही. असे हजारो लोक आहेत. ज्यांना घाबरवण्यात आले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे लोकं असेच गेले नाही. ज्या शक्तीचा मी उल्लेख करत आहे त्यांनी या लोकांचा गळा पकडून त्यांना भाजपसोबत घेतलं आहे. त्यामुळे हे सगळे लोक घाबरून भाजपसोबत गेले आहेत.असे ही राहुल गांधी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या