COVAXIN वर शंका घेणाऱ्यांना भारत बायोटेकच्या MD नी दिलं उत्तर, म्हणाले..

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली । Delhi

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGI ने दोन करोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. डीसीजीआयचे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली. मात्र, ‘कोव्हॅक्सीन’च्या तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु असताना लसीला मान्यता कशी दिली ? हा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश व शशी थरूर यांनी प्रश्न उपस्थित केले होते. याबाबत भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी उत्तर दिलं आहे.

भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी म्हंटले आहे की, कोव्हॅक्सिनचा मुद्दा आता राजकीय झाला आहे. त्यामुळे मी यावर माझं स्पष्ट मत नोंदवू इच्छितो. माझ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा राजकीय पक्षाशी संबंध नाही. आम्ही केवळ भारतातच वैद्यकीय चाचण्या घेतलेल्या नाहीत तर आम्ही यूके सह एकूण १२ देशांमध्ये वैद्यकीय चाचण्या घेतल्या आहेत. आम्ही पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि इतर देशांमध्येही चाचण्या घेत आहोत. भारत बायोटेक ही केवळ भारतीय कंपनी नाही तर ती जागतिक कंपनी आहे. आता अनेकजण आम्ही पुरेशी माहिती देत नसल्याचा तसेच माहितीमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप करत आहेत. माझ्यामते अशा मंडळींनी इंटरनेटवर शोध घेऊन विविध आंतरराष्ट्रीय पत्रकांमध्ये प्रसिद्ध झालेली माहिती वाचावी. या लसीवर सुमारे ७० हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. असे कृष्णा इल्ला यांनी सांगितले आहे.

काय म्हंटले होते जयराम रमेश व शशी थरूर?

काँग्रेस ज्येष्ठ नेते जयराम रमेश व शशी थरूर यांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, “भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप झालेली नाही. कोवॅक्सिनला अपत्कालीन मंजुरी देणे धोकादायक ठरू शकते. डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. करोना लसीचे ट्रायल पूर्ण होईपर्यंत याचा वापर करणे टाळले पाहिजे. भारतात सध्या अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस वापरली पाहिजे.”

तर, जयराम रमेश यांनी देखील कोव्हॅक्सिनबद्दल आक्षेप नोंदवला असून, “भारत बायोटेक प्रथम श्रेणीचा उद्योग आहे. परंतु आश्चर्यकारक बाब ही आहे की, कोव्हॅक्सिनसाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचणी संबंधी आंतरराष्ट्रीयस्तरावर मान्यता मिळालेल्या प्रोटोकॉलमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं पाहिजे.”

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *