Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशआज ‘भारत बंद’! दिल्लीच्या सीमेवर तणाव, सुरक्षेत वाढ

आज ‘भारत बंद’! दिल्लीच्या सीमेवर तणाव, सुरक्षेत वाढ

दिल्ली | Delhi

केंद्राकडून (Modi Govt) लागू करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात (Farm Law 2020) गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन (farmers protest) सुरू आहे. मात्र, सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये (Government and farmers associations) गेल्या काही महिन्यांत चर्चाही होऊ शकलेली नाही.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून आज पुन्हा एकदा ‘भारत बंद’ची (Bharat Band) हाक देण्यात आलीय. आज(सोमवारी) सकाळी ६ वाजल्या पासून ४ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे.

या आंदोलनाला काँग्रेस (Congress) आणि आपने (AAP) पाठिंबा जाहीर केला आहे. तर आजच्या बंदला राजकीय पक्षांसह (Politicals Party) अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आजच्या भारत बंदमुळे काही राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर (Transportation system) मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारत बंदच्या (Bharat Bandh Latest News) पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. स्थानिक पातळीवरही पोलीस बंदोबस्त राहणार आहे. तसंच आज बाजार समित्या, शहरातील मुख्य मार्केट यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान भारत बंदमुळे नोएडामध्ये वाहनांची मोठी रांगच रांग दिसून येतेय. दिल्ली गुरुग्राम हायवेवर अनेक किलोमीटर केवळ वाहनांची रांग लागलेली दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या