Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याPhoto Gallery : सटाणा शहरात बंदला १०० टक्के प्रतिसाद

Photo Gallery : सटाणा शहरात बंदला १०० टक्के प्रतिसाद

नाशिक | प्रतिनिधी

कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून नवी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. सरकारशी चर्चा करूनदेखील कुठल्याही प्रकारचा तोडगा अद्याप निघालेला नाही.या पार्श्वभूमीवर आज आंदोलकांच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

- Advertisement -

आज नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात नागरिक, व्यापारी, शेतकऱ्यांनी बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. सकाळपासून शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत असून हा बंद यशस्वी करण्यासाठी स्थानिकांकडून आवाहन केले जात आहे.

व्यावसायिकांनी उत्स्फुर्तपणे बंद ठेवलेले दुकाने

सटाणा शहरातील नेहमीच वर्दळीचे असलेले रस्ते बंदच्या पार्श्वभूमीवर निर्मनुष्य दिसून आले. अनेक दिवसांनी याठिकाणी स्मशानशांतता बघायला मिळाली.

आज सकाळी भाजप वगळता शहरातील वेगवेगळ्या पक्षातील नागरिकांनी नेत्यांनी एकत्र येत हा बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन केले.

सकाळी काही नागरिकांनी दुचाकीवरून शहरात फेरफटका टाकत बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन केले.

महात्मा फुले पुतळ्याजवळ नागरिकांनी एकत्र येत बंदला प्रतिसाद दिला.

शहरातून कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे फेरफटका टाकत नागरिकांना बंद पाळण्यासाठी आवाहन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या