Thursday, April 25, 2024
Homeनगरभानसहिवरा येथे मटका अड्ड्यावर छापा; दोघांवर कारवाई

भानसहिवरा येथे मटका अड्ड्यावर छापा; दोघांवर कारवाई

नेवासा |तालुका वार्ताहर|Newasa

नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकून मटका जुगार खेळणार्‍या व खेळवणार्‍या दोघांवर कारवाई केली.

- Advertisement -

याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर मुरलीधर माने यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, हवालदार विजयकुमार वेठेकर यांनी गुप्त बातमीदारामर्फात बातमी मिळाली की, भानसहिवरा गावात बसस्टॅण्डजवळ टपरीच्या आशाडोशाला शामराव कुसळकर हा कल्याण नावाचा हारजितीचा मटका जुगार लोकांना चिठ्ठ्यांवर आकडे लिहून देवून त्यांचेकडून पैसे घेवून खेळत व खेळवत आहे.

त्यानंतर नेवासा पोलीस ठाणे येथील पोलीस कर्मचार्‍यांसह भानसहिवरा गवात छापा टाकला असता बसस्टॅण्डजवळ एक इसम टपरीच्या आडोशाला लोकांना चिठ्ठ्यांवर आकडे लिहून घेवून त्यांचेकडून पैसे घेत असल्याचे दिसून ले. त्याने त्याचे नाव शामराव रामा कुसळकर (वय 59) रा. वडारगल्ली ता. नेवासा असे सांगून त्यास सदरचा मटका कोणासाठी घेतो असे विचारले असता किशोर रामभाऊ तट्टू रा. नेवासा बुद्रुक (फरार) याचे आर्थिक फायद्याकरीता घेत असल्याचे सांगितले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात 2280 रुपयांची रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व मटका साहित्य मिळून आले. पोलिसांनी शामराव रामा कुसळकर व किशोर रामभाऊ तट्टू यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या