Friday, April 26, 2024
Homeनगरभानगावचा मृत कावळा पॉझिटिव्ह

भानगावचा मृत कावळा पॉझिटिव्ह

अहमदनगर (प्रतिनिधी)

करोनानंतर आता नगरकरांवर बर्ड फ्लूचे संकट घोंगावत आहे. भानगाव (ता. श्रीगोंदा) येथील कावळ्याचा बर्ड फ्ल्यूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

यामुळे पशुसंवर्धन विभाग खबरदारी म्हणून एक किलो मीटरचा भाग सॉनिटाईज करणार आहे. यासह परिसरातील पोल्ट्री फार्म, कोंबडयाचे खूराडे निजुर्ंतिकीकरण करणार असल्याचे जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, नगरजवळ 151 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. या कोंबड्यांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुण्यात पाठविले असल्याची माहिती पशू संवर्धन विभागाने दिली.

नगर तालुक्यातील निंबळक व आठवड गावात कोंबड्या मृत झाल्याची घटना समोर आली आहे. पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. निंबळकमध्ये 46 तर आठवडला 105 अशा 151 कोंबड्याचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. नगर पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी निंबळक आणि आठवड गावात पोहचले आहेत. निंबळकमध्ये ज्या ठिकाणी 46 कोंबड्या मेल्या त्या आसपासच्या एक किलोमीटर परिसरात या प्रकारची एकही घटना घडलेली नाही. हाच काहीसा दिलासा मिळाला आहे. आठवड आणि निंबळक गावात पशुसंधर्वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून औषध फवारणी सुरू केली आहे. निंबळक नगर शहरालगत असून आठवड 25 किलोमीटर अंतरावर आहे. बर्ड फ्लूची धसका असतानाच नगरजवळच घडलेल्या या घटनांनी नगरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. बर्ड फ्लू आहे किंवा नाही याची खात्री तपासणी अहवालानंतरच कळणार असल्याचे सांगण्यात आले.

बाराबाभळीमध्ये औषध फवारणी

गत आठवड्यात बाराबाभळी येथे साळुंकी पक्षाचा मृत्यू झाला होता. त्याचेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील साळुंकी पक्षाचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचा संशय पशूसंवर्धन विभागाला आहे. या साळुंकीचा अहवाल अद्याप आलेला नसून तो आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने तातडीने या गावात औषध फवारणी सुरू केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या