Wednesday, April 24, 2024
Homeनगरभंडारदरा पाणलोटत जोरदार पाऊस

भंडारदरा पाणलोटत जोरदार पाऊस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हवामान खात्याच्या अंदाजानुसार (Weather department forecast), विकेंडनंतर सोमवारी, 16 ऑगस्ट रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोदिंया या जिल्ह्यांत विजांच्या कडकडासह वेगवान वार्‍याच्या साथीनं जोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट (Yellow alert from the weather department) जारी केला आहे. तर याच दिवशी पुणे, अहमदनगर (Ahmednagar), औरंगाबाद (Aurangabad) आणि जालना या चार जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा (Hint) हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, भंडारदार (Bhandardara) वार्ताहराने कळविले की, काल शुक्रवारी 8 वा. पासून भंडारदरा (Bhandardara) तसेच पाणलोटामध्ये (Watershed) जोरदार पाऊस सुरु होता. रात्री 11 वा. पर्यंत पावसाच्या (Rain) सरी जोरदार कोसळत होत्या. पाऊस सुरु आसल्याने थंडावलेली आवक वाढण्याची शक्यता आहे. 15-16 ऑगस्ट रोजी या धरणाचा पाणीसाठा (Water Storage) 10500 दलघफू जाण्याची शक्यता आहे. मुळा पाणलोटातही (Mula Watershed) पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली.

अशी घ्या खबरदारी…

शेतात काम करीत असताना शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्यावा. कुठलेही वायू असलेले इलेक्ट्रिकचे उपकरण हाताळू नका; वापरू नका. नळाचे कुठलेही काम करू नका. तसेच दारे व खिडक्यांपासून दूर रहा. विजेपासून वाहणारा प्रवाह (करंट) तारांमधून; केबलमधून; तसेच पाईपमधून वाहून तुमच्या शरिराला इजा, नुकसान पोहोचवू शकतो. पाऊस व वीज होत असताना एखादी इमारत जवळ नसेल तर झाडाखाली चुकूनही उभे राहू नका. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादीजवळ उभे राहू नका. धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका. विजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर कधीच करू नका. सायकल, मोटरसायकल, उघडा ट्रॅक्टर यांच्यावरील प्रवास थांबवा.

- Advertisment -

ताज्या बातम्या