Thursday, April 25, 2024
Homeनगरभंडारदरा पूर्ण क्षमतेने भरले !

भंडारदरा पूर्ण क्षमतेने भरले !

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara | Kotul

उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेले भंडारदरा धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरले आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात

- Advertisement -

सायंकाळी 10974 दलघफू (99.44टक्के)पाणीसाठा आहे.पाण्याची आवक झाल्यास आज हे धरण पूर्ण क्षमतेने 11039 दलघफू करण्याचा पाटबंधारे विभागाचा विचार आहे.

पाणलोटात पावसाचा जोर ओसरला असलातरी अधून मधून कोसळणार्‍या सरींमुळे धरणात नव्याने पाणी दाखल होत आहे. काल सायंकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 321 दलघफू पाणी दाखल झाले.

त्यामुळे सायंकाळी पाणीसाठा 10974 दलघफू झाला होता. सकाळी तो 10922 दलघफू होता. काल दिवसभरात भंडारदरा येथे 10 मिमी पावसाची नोंद झाली.

निळवंडे धरणातही पाण्याची आवक सुरू आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत या धरणात 343 दलघफू पाणी नव्याने जमा झाले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 7508 (90.24टक्के) झाला होता. सायंकाळी त्यात आणखी नवीन पाण्याची भर पडली.

पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने मुळा धरणात केवळ 3222 क्युसेकने आवक होत आहे. त्यामुळे 26000 दलघफू क्षमतेच्या धरणात काल मंगळवारी सकाळी 6 वाजता 23508 दलघफू (90.41 टक्के) साठा झाला होता. सायंकाळी तो 91 टक्क्याच्या पुढे सरकला. गत 24 तासांत धरणात नव्याने 484 दलघफू पाणी जमा झाले. निळवंडे धरणातून 2526 क्युसेकने पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. ओझरचा ओव्हरफ्लो 2543 क्युसेक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या