Thursday, April 25, 2024
Homeनगरभंडारदरा पाच तर मुळाची तीन आर्वतने

भंडारदरा पाच तर मुळाची तीन आर्वतने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भंडारदरा धरणातून शेतीसाठी रब्बी हंगामात दोन आणि उन्हाळी हंगामासाठी पाण्याचे तीन आर्वतने सोडण्यात येणार आहेत.

- Advertisement -

भंडारदरा आणि निळवंड धरणात चालूवर्षी 18 टिएमसीपेक्षा अधिक पाणी असल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी पाण्याची एकूण पाच आर्वतने सोडण्यात येणार आहेत. भंडारदराच्या या आर्वजनला शनिवार (दि.26) सुरूवात होणार आहे. यासह प्रवरा नदवरील निळवंडे धरणापासूनची सर्व कोपा बंधारे यात पाणी सोडण्यातचा निर्णय घेण्यात आला.

गुरूवारी ऑनलाईन व्हिडीओ कॅन्फरंसव्दारे झाले बैठकीत भंडारदरा धरणाच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही नियोजन बैठक झाली. या ऑनलाईन बैठकीला पाटबंधारे खात्याच्या अधिक्षक अभियंता अल्का अहिरराव, मुख्य अभियंता किरण कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यात भंडारदरा धरणाच्या पाणी नियोजनात रब्बी हंगामासाठी 2 आणि उन्हाळी हंगामासाठी 3 पाण्याचे आर्वतन सोडण्यात येणार आहे. भंडारदार आणि निळवंडे धरणात 18 टीएमसीपेक्षा अधिक पाणी असल्याने रब्बी हंगामासाठी 27 दिवसांचे सव्वातीन टिमएमसीचे दोन आर्वतनाचा यात समावेश असून उन्हाळी आवर्तनात साडेतीन आणि एक टिमसीच्या आवर्तनाचा समावेश राहणार आहे. उन्हाळी हंगामातील आर्वतनाचा कालावधी हा मागणीनूसार राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता गणेश नाणोर यांनी सांगितले.

15 जानेवारीपासून मुळाचे आर्वतन

या ऑनलाईन बैठकीत मुळा धरणातील पाण्याचे नियोजन करण्यात आले. यात 15 जानेवारीपासून मुळा धरणाचे पहिले आर्वतन सोडण्यात येणार आहे. यंदा मुळा धरणाच्या उजवा कालव्यातून रब्बीसाठी 1 आणि उन्हाळी हंगामासाठी 2 आर्वतन सोडण्यात येणार आहेत. हे प्रत्येक आवर्तन सोडचार टीएमसीचे राहणार असून मुळा डाव्या कालव्याला रब्बी हंगामासाठी 1 आणि उन्हाळी हंगामासाठी 3 आवर्तने सोडण्यात येणार आहेत. यात प्रत्येक आवर्तन हे चार टीएमसीचे राहणार आहे.

अशी असतील आवर्तने

भंडारदरा-निळवंडेचे शनिवारपासून आवर्तन

प्रवरा नदीवरील कोल्हापूर बंधार्‍यांतही पाणी सोडणार

मुळाचे आवर्तन 15 जानेवारीपासून

मुळातून रब्बीसाठी 1, उन्हाळी हंगामासाठी 2 आवर्तने

कुकडी आवर्तनाचा निर्णय 26 डिसेंबरला

कुकडी प्रकल्प सिंचन मंडळाची बैठक 28 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. यात होणार्‍या निर्णयावर कुकडी धरणातून रब्बी आणि उन्हाळी आवर्तनाचा निर्णय होणार आहे. या पाण्याचा लाभ जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत, करमळा या तालुक्यांना होतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या