Friday, April 26, 2024
Homeनगरभानसहिवरा येथील हत्येप्रकरणी तिघा भावांवर खुनाचा गुन्हा दाखल

भानसहिवरा येथील हत्येप्रकरणी तिघा भावांवर खुनाचा गुन्हा दाखल

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

चौघा सख्ख्या भावांमध्ये जमिनीच्या झालेल्या वादातून तीक्ष्ण हत्याराने एकाची हत्या झाल्याप्रकरणी मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरून

- Advertisement -

अन्य तिघा भावांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. या तिघांना रविवारीच ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. त्यांना काल सोमवारी नेवासा न्यायालयात हजर केले असता तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील भानसहिवरा येथे जमिनीच्या वादातून रविवार दि.20 डिसेंबर रोजी नईम अब्दुललतीफ देशमुख (वय 55) या व्यक्तीचा खून झाला होता. पोलिसांनी त्याच दिवशी मयताच्या तिघा भावांना ताब्यात घेतले होते.

सोमवार दि.21 डिसेंबर रोजी या घटनेतील मयत नईम अब्दुल्ललतीफ देशमुख यांचा मुलगा साहील नईम देशमुख (वय 24) रा.भानसहिवरा, धंदा-मजुरी ह.रा. मुकुंदनगर अहमदनगर याने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यावरून नईमचे सख्खे भाऊ नदीम अब्दूललतीफ देशमुख, मोईन अब्दूललतीफ देशमुख, रफिक अब्दूललतीफ देशमुख या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या