Wednesday, April 24, 2024
Homeनगरभालसिंग खून प्रकरण : कासारसह 9 जणांविरूद्ध मोक्का

भालसिंग खून प्रकरण : कासारसह 9 जणांविरूद्ध मोक्का

अहमदनगर (प्रतिनिधी) –

नगर तालुक्यातील वाळकी येथील तरूण ओंकार भालसिंग खून प्रकरणातील आरोपी विश्‍वजित रमेश कासार याच्यासह नऊ जणांविरूद्ध

- Advertisement -

मोक्का लावण्यात आला आहे. जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या मोक्का प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

विश्‍वजित रमेश कासार (वय 28), इंद्रजित रमेश कासार (वय 25), मयूर बापूसाहेब नाईक (वय 30), संकेत भाऊसाहेब भालसिंग (सर्व रा. वाळकी ता. नगर), सुनील फक्कड अडसरे (रा. शेंडाळा ता. आष्टी जि. बीड), शुभम बाळासाहेब लोखंडे (रा. करंडे ता. शिरूर जि. बीड), सचिन भांबरे (रा. खेतमाळवाडी ता. श्रीगोंदा), भरत भिमाजी पवार (वय 26 रा. साकत ता. नगर), संतोष भाऊसाहेब धोत्रे (रा. कारगाव ता. आष्टी जि. बीड) असे मोक्का लावलेल्या आरोपींचे नावे आहेत. यातील विश्‍वजित कासार, इंद्रजित कासार, मयुर नाईक, भरत पवार, संतोष धोत्रे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपी पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

विश्‍वजित कासार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूद्ध अहमदनगर जिल्ह्यासह जालना, पुणे जिल्ह्यात विविध कलमान्वये 22 गुन्हे दाखल आहेत. सध्या विश्‍वजित कासार हा सुपा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरण, खंडणीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत आहे. विश्‍वजित कासार याच्यासह अन्य आरोपींनी वाळकी येथील तरुण ओंकार भालसिंग याचा खून केला होता. सध्या या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक अजित पाटील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या