Friday, April 26, 2024
Homeनाशिकभालदेव उत्सवाची सांगता

भालदेव उत्सवाची सांगता

भऊर । वार्ताहर Bhaur

करोनाचा प्रादुर्भाव असला तरी कसमादे परिसरात परंपरागत सण-उत्सव उत्साहाने साजरे केले जात आहे.

- Advertisement -

दुभत्या जनावरांनी भरभरून दूध द्यावे तसेच त्यांचे आरोग्य निरोगी रहावे व गाय, म्हशींसह गुरांनी गोठा भरलेला राहावा यास्तव भालदेव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. भाद्रपद महिन्याच्या पहिल्या दिवशी भालदेव उत्सवाची सुरवात मोठ्या उत्साहाने करण्यात आली होती. गाई-म्हशीच्या गोठ्यात शेण, घरातील कचरा, चुलीतील राख या गोष्टी एकत्र करून भालदेवाची विधीवत स्थापना केली जाते.

भालदेवाचे आगमन झाल्यानंतर घरातील कुठल्याही गोष्टीची विक्री केली जात नाही किंवा घरातील कोणतीही गोष्ट कुणाला दिली जात नाही. घरातील सर्वच व्यवहार या काळात ठप्प होतात. गोठ्यात जास्त दुभती जनावरे असली तर दुधाची विक्री न करता दुधापासून दही, ताक, तूप बनविले जाते. मात्र विक्री केली जात नाही हे या दिवसांचे मुख्य वैशिष्टय असते.

भालदेव उत्सव पाच, सात किंवा नऊ दिवसांचा साजरा करण्याची परंपरा यंदा देखील जपली गेली. उत्सव सांगतेच्या दिवशी शेणापासून गाय गोठ्याची प्रतिकृती साकारण्यात येवून पांढर्‍या रंगाचे लहान-लहान दगड ठेवले गेले. शेणापासून तयार केलेली केरसुणी, ताक बनविण्यासाठी लागणारी रही (रवी), पाच दिवे, वेणी, फणी, गाईके (गाई सांभाळणारा) यांची तसेच लव्हाळा, रुई व आव्हळी यांची पान, फुले यांची देखील मांडणी केली गेली.

भालदेवावर दूध-भाताचा नैवेद्य दाखवून उत्सवाची सांगता गेली. तृतीया, पंचमी, अष्टमी व नवमी अशा विविध दिवशी प्रथेप्रमाणे विधीपूर्वक भालदेवाचे विसर्जन केले गेले.

- Advertisment -

ताज्या बातम्या