Thursday, April 25, 2024
Homeनगरभाळवणी येथे तीन वाहनांच्या अपघातात एक ठार, एक जखमी

भाळवणी येथे तीन वाहनांच्या अपघातात एक ठार, एक जखमी

भाळवणी |वार्ताहर| Bhalavani

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे गोरेगाव चौकात खडी वाहतूक करणारा हायवा डंपर, उसाने भरलेला ट्रॅक्टर व पिकअप टेम्पो

- Advertisement -

या तीन वाहनांचा विचित्र अपघात शुक्रवारी रात्री 12.30 च्या सुमारास घडला असून त्यात ट्रॅक्टरमधील एक जण जागीच ठार, एक जबर जखमी झाला तर एक किरकोळ जखमी झाला आहे.

बेल्हा पाडळी येथील शेतकर्‍याचा उसाने भरलेला ट्रॅक्टर भाळवणीच्या दिशेने येत असताना खडीने भरलेला डंपर (एम. एच. 20 डीई 4726) पाठीमागून भाळवणीकडेच येत होता तर पिकअप टेम्पो (एम.एच. 05 ईएल 0357) कल्याणच्या दिशेने जात होता. ट्रॅक्टर पुढे चाललेला असताना समोरून पिकअप टेम्पो येत होता.

त्याचवेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागून खडीने भरलेला डंपर भरधाव वेगात येत होता. यावेळी डंपर समोर चाललेला उसाचा ट्रॅक्टर चालकाच्या लक्षात न आल्याने जोराची धडक होऊन ट्रॅक्टरचे ट्रॉलीसह चार तुकडे होऊन साईडच्या गटारात जाऊन पडले तर डंपर विरुद्ध दिशेने रोडच्या बाजूला पलटी झाला. या वाहनांच्यामध्ये पिकअप टेम्पो आल्याने पिकअपची चालकाच्या पाठीमागील बाजू पूर्णपणे चिरली गेली.

यावेळी घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. जखमींना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. पुढील तपास पारनेर पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या