Saturday, April 27, 2024
Homeनाशिकभजनी मंडळाला साहित्य पुरवठा योजना गुंडाळणार?

भजनी मंडळाला साहित्य पुरवठा योजना गुंडाळणार?

नाशिक । Nashik

वारकरी संप्रदायाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेने भजनी मंडळाला साहित्य पुरवण्यासाठी सुरु केलेली योजना गुंडाळावी लागणार आहे. गेल्या वर्षभरात समाज कल्याण विभागाकडे एकही प्रस्ताव प्राप्त न झाल्याने या विभागाचे सात लाख रुपये पडून आहेत.

- Advertisement -

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती डॉ.सयाजी गायकवाड यांनी आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात ही योजना सुरु केली होती. त्यासाठी 2020-21 च्या अर्थसंकल्पात 5 लाख रुपये तरतूद असताना इतर योजनांना कात्री लावत सदस्यांनी हा निधी दोन लाख रुपयांनी वाढवत 7 लाख रुपये केला.

त्यामुळे वारकरी संप्रदायाला यातून टाळ, मृदुंग, वीणा, पखवाज, चिपळ्या आदी साहित्य खरेदीसाठी 50 हजार रुपये अनुदान देण्याची तरतूद केली.

भजनी मंडळात अनुसूचित जाती, जमाती या संवर्गातील व्यक्तिंचा समावेश कमीच असल्यामुळे अद्याप एकही प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे प्राप्त झालेला नाही.

सर्वसाधारण संवर्गातील व्यक्तींचा भजनी मंडळात समावेश होत असल्याने त्या व्यक्तिंसाठी ही योजना बसत नसल्याचे सांगत उपाध्यक्षांनी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. आता हा निधी इतर योजनांसाठी खर्च करावा लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या